AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाची मुसंडी! परभणीत सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, तुमच्या शहरातील भाव घ्या जाणून

Petrol Diesel Price Today : तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने उत्पादन घटविण्याचा घेतलेल्या निर्णयाचा लागलीच परिणाम दिसून आला. आज राज्यात परभणीत पेट्रोल-डिझेलचा भाव गगनाला भिडले. तुमच्या शहरातील किंमत काय

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाची मुसंडी! परभणीत सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, तुमच्या शहरातील भाव घ्या जाणून
आजचा भाव काय
| Updated on: Apr 04, 2023 | 8:47 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकले. त्याचा परिणाम लागलीच देशभरात दिसून आला. जगातील तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने जागतिक बाजारात दबाव झुगारण्यासाठी जूनपर्यंत उत्पादन घटवले आहे. तर तुर्कीने एका प्लँटमधून उत्पादन कमी केले आहे. उत्पादन घटविल्यामुळे बाजारात मागणी जास्त आणि पुरवठा कमी या समीकरणाने दरवाढीला चालना दिली. चीनमधील परिस्थितीत झपाट्याने सुधारत आहे. झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. त्यामुळे कच्चा तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वच देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमत (Petrol Diesel Price) वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारपेठेला हादरा

वृत्तसंस्था रॉटर्सच्या मते, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ओपेक देशांनी 2 दशलक्ष बॅरल उत्पादन घटवले होते. आता ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज तसेच रशियाने रविवारी उत्पादन घटविण्याचा बॉम्ब टाकला. प्रतिदिन 1.16 दशलक्ष बॅरल (bpd) उत्पादन घटविण्याचा निर्णय या देशांनी घेतला. त्यामुळे बाजार हादरला आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोल-डिझेल महागले आहे. परभणीत एक लिटर पेट्रोल 109.47 रुपये तर डिझेल 95.96 प्रति लिटरवर पोहचले.

कच्चा तेलाचे भाव काय

भारतात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची (WTI Crude Oil) किंमत 80.53 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 84.96 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 107.17 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.07 पेट्रोल आणि डिझेल 93.55 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच