AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : औरंगाबादमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी कपात! इतर शहरात महाग, काय आहे आजचा भाव

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. काल या किंमतींनी उसळी घेतली होती. त्यामुळे इंधनाचे दर भडकतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण आज किंमतीत घसरण झाली. त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?

Petrol Diesel Price Today : औरंगाबादमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी कपात! इतर शहरात महाग, काय आहे आजचा भाव
आजचा भाव काय
| Updated on: Mar 30, 2023 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) आज घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच काल 80 डॉलरच्या जवळपास गेल्या होत्या. त्यानंतर भाव घसरले. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रातील अस्थिरता याला कारणीभूत ठरत आहे. तसेच चीनने मागणी वाढवल्याने त्याचा फटका बसत आहे. त्यातच रशियाने मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन घटवले आहे. तर तुर्कीने त्यांचा एक प्लॅँट तात्पुरता बंद ठेवला आहे. बँकिग सेक्टरमधील घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी इंधनाच्या किंमती अपडेट केल्या. आज राज्यात औरंगाबाद येथील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) मोठी कपात दिसून आली.

कच्चा तेलाचा भाव

आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) घसरण होऊन ते 72.92 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) घसरण झाली. आज हा भाव 78.24 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय

औरंगाबादमध्ये इंधन दरात कपात

औरंगाबादमध्ये काल एक लिटर पेट्रोलचा भाव 108 रुपये होता. तर आज हा भाव 106.77 रुपये आहे. डिझेलचा भाव काल 95.96 रुपये प्रति लिटर होता. आज हा भाव 93.27 रुपये झाला आहे. या दोन्ही भावात सव्वा ते दीड रुपयांची घसरण झाली आहे. राज्यातील काही शहरांत इंधन दरात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी फार मोठा बदल झाला नाही.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचा दर (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.77 पेट्रोल आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.78 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...