AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Purchase : दादरच्या रानडे रोडवरील प्रसिद्ध ज्वेलर्स पांडुरंग वैद्य यांची मोदींच्या आवाहनावर काय प्रतिक्रिया?

Gold Purchase : "निवडणुका होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हे आवाहन केले नाही किंवा सोन्यावर सेस वाढवला नाही. मात्र निवडणुका होताच त्यांनी याची घोषणा केली. पंतप्रधानांनी आवाहन केलं असलं तरी लोक सोनं म्हणजे सेफ गुंतवणूक समजतात"

Gold Purchase : दादरच्या रानडे रोडवरील प्रसिद्ध ज्वेलर्स पांडुरंग वैद्य यांची मोदींच्या आवाहनावर काय प्रतिक्रिया?
Gold
| Updated on: May 13, 2026 | 1:59 PM
Share

दादरच्या रानडे रोडवरील प्रख्यात आणि सगळ्यात जुन्या असलेल्या मेसर्स पांडुरंग वैद्य या सोन्याच्या दुकानामध्ये मोदींच्या आवाहनानंतर गर्दी ओसरली आहे. एरवी पाय ठेवायला जागा नसते मात्र आता ग्राहकांची गर्दी कमी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहन नंतर ही गर्दी कमी होत असल्याचं बोलले जात आहे. “पंतप्रधान मोदींनी जे विधान केलेलं आहे, या विधानाशी आम्ही पूर्णपणे सहमत नाही आहोत. कारण जर सोन विक्री बंद झाली तर मग आम्हाला रोजगार कुठून मिळणार?. आम्हाला दुकान चालवणं कठीण होऊन जाईल. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे पगार आहेत जे आम्हाला द्यायचेच आहेत आणि त्यामुळे एक अतिरिक्त बोजा आमच्यावरती येतोय. एक प्रकारचे दडपण आहे जे दर वाढत आहेत, त्याच्यामुळे मजुरी देखील कईक टक्क्यांनी वाढते आणि ही सुद्धा चिंतेची बाब आहे. आम्हाला असं वाटतंय की ग्राहक मजूरी टाळण्यासाठी थेट गोल्ड बार विकत घेत आहेत. अराजक माजेल, सरकारने एखादी स्कीम काढली तर स्वागतच करू” असं पांडूरंग वैद्य म्हणाले.

“हार घेण्याची फार आवड आहे. मात्र असं करता येणार नाही असं वाटतंय. कारण हा सात तोळ्याचा हार आहे. बजेट कमी आहे, त्यामुळे छोटा हार आता घ्यावा लागणार आहे. मनाला मुरड घालावी लागेल” असं एका महिला ग्राहकाने सांगितलं. “सोनं हा महिलांसाठी सगळ्यात ऊत्तम पर्याय आहे त्यामुळे महिला सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. सोन्याचे दर वाढतात ही चिंतेची बाब आहे आणि वारंवार हे दर वाढत चाललेत. हे दर परवडत नाहीत, मात्र सोनं तर घ्यावेत लागतं. त्याशिवाय लग्न सराई होत नाही” असं महिला ग्राहक म्हणाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सराफ व्यापारी नाराज

“पंतप्रधानांनी आवाहन केले असले तरी एक ते दीड कोटी सराफ व्यापारी कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल. व्यापारी आणि कारागिरांसाठी त्यांनी काय पर्याय व्यवस्था केली आहे. जे कार्पोरेट मंडळी सोने व्यापारात उतरले आहेत, त्यांना वर्षभर सोने खरेदी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी करावे. एकीकडे सोन्यावर सेस वाढवला. त्यामुळे सोनं महाग झालं आहे आणि दुसरीकडे हे आवाहन केले. त्यामुळे सराफा व्यापारी पूर्णपणे अडचणीत आलाय.  ऐनवेळी सर्वात फास्ट फंड उपलब्ध करून देणारी एकमेव गुंतवणूक म्हणजे सोनं आहे” अशी प्रतिक्रिया सोलापुरातील सराफा व्यापाऱ्याने दिली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?