कधी गंगाघाटावर मोफत वाटली गेली, आज कोट्यवधीचा ब्रँड बनलेल्या Patanjali Dant Kanti ची कहाणी !

आज घरो-घरी ओळखली जाणारी पतंजलि दंत कांती टूथपेस्ट कोट्यवधी रुपयांचा ब्रँड वॅल्यू बनली आहे, पण एक वेळ अशीही होती की या टुथपेस्टला गंगाकिनारी लोकांना मोफत वाटले होते..एका ब्रँडची ही अनोखी कहानी..

कधी गंगाघाटावर मोफत वाटली गेली, आज कोट्यवधीचा ब्रँड बनलेल्या Patanjali Dant Kanti ची कहाणी !
| Updated on: May 19, 2025 | 7:51 PM

योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या पतंजली आयुर्वेदिक कंपनीचा टूथपेस्ट ब्रँड पतंजली दंत कांती आज घराघरात ओळखला जातो. या ब्रँडची व्हॅल्यू अनेक कोटींपर्यंत पोहोचली आहे. परंतू या टूथपेस्टच्या निर्मितीमागची कहाणी मोठी रंजक आहे. कधी काही पतंजलीची दंतकांती हरिद्वार येथील गंगातीरावर लोकांना मोफत वाटली गेली होती. आता तो कोट्यवधी रुपयांचा ब्रँड बनला आहे.

‘पतंजली दंत कांती’ ही टूथपेस्ट येण्यापूर्वी ती आयुर्वेदिक टुथ पावडरीच्या स्वरुपात आली होती. आयुर्वेद आणि भारतातील पारंपारिक ज्ञानातून या टुथपेस्टची निर्मिती झाली होती. हेच ज्ञान जे हजारो वर्षांपूर्वी दंतमंजन तयार करण्यासाठी सामान्य घरात वापरले जात होते.

ही टूथपेस्ट बाबा रामदेव यांच्या योग शिबिरं, मदत शिबिरं, स्थानिक मेळावे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि हरिद्वारमधील गंगा नदीच्या काठावर मोफत वाटली होती. लोकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, पतंजली आयुर्वेदाच्या तज्ञ्जांनी  ‘दंत कांती’ बनवण्याचे काम सुरु केले.

टूथपेस्ट ते ‘दंत कांती’ पर्यंतचा प्रवास

टूथपेस्ट आणि दंत मंजन या दोघांचेही स्वतःचे स्वतंत्र गुण आहेत, परंतु टूथपेस्ट फक्त दात स्वच्छ करते, तर भारतीय ज्ञानावर आधारित ‘दंत मंजन’ दातांच्या सर्व समस्यांना सोडवते. अशा परिस्थितीत, पतंजलीच्या तज्ञ मंडळींनी या दोन्हींचे गुणधर्म एकत्र करीत ‘दंत कांती’ तयार केली.

साल २००२ मध्ये, पतंजलीची टीम हर्बल टूथपेस्ट बनवण्याच्या मोहीमेवर काम करीत होती. सुरुवातीला, या टुथपेस्ट पतंजलीने गंगेच्या काठावर मोफत वाटण्यासाठी वापरलेली टूथपेस्ट टूथपेस्ट बेस म्हणून वापरून तिचे नाव ‘दंत कांती’अशा नव्या ब्रँडमध्ये केले. त्यानंतर, त्याच्या बेसमध्ये हर्बल अर्क आणि आवश्यक तेले देखील मिसळण्यात आली आणि लोकांना आवडलेला ब्रँड दंत कांती अखेर बाजारात अवतरित झाला.

‘दंत कांती’ कोट्यवधींचा ब्रँड बनला

आयुर्वेदिक घटक आणि इतर गुणधर्मांमुळे ‘पतंजली दंत कांती’ लवकरच सर्वसामान्य कुटुंबांत लोकप्रिय झाली.साल २०२०-२१ या आर्थिक वर्षात केवळ ‘दंत कांती’मुळे पतंजलीला ४८५ कोटी रुपयांचा नफा झाला. आज, पतंजलीची ‘दंत कांती’ ही कोट्यवधी लोकांच्या घरात पोहचली आहे, इतकेच नाही तर त्याची ब्रँड व्हॅल्यू देखील अनेक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.