AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Bonus : दिवाळीत कंपनीकडून मिळाला बोनस, मग टॅक्स लागणार का? जाणून घ्या आयकरचा नियम

Diwali Bonus Tax : दिवाळी अगदी पुढ्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस, गिफ्ट वाटपाचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. पण दिवाळी बोनसवर टॅक्स द्यावा लागतो काय? काय सांगतो आयकर नियम?

Diwali Bonus : दिवाळीत कंपनीकडून मिळाला बोनस, मग टॅक्स लागणार का? जाणून घ्या आयकरचा नियम
दिवाळी बोनसवर कर?
| Updated on: Oct 17, 2025 | 9:31 AM
Share

Income Tax Rules : ‘दिवाळ सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हटल्या जाते. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस, गिफ्ट आणि मिठाई वाटपाचा धडाका लावला आहे. काही कंपन्या मिठाई, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू वा गिफ्ट व्हाऊचर पण देत आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. पण दिवाळीला दिलेला बोनस अथवा कंपन्यांनी दिलेले गिफ्ट हे कराच्या परिघात येते का? अनेकांना वाटते की सणासुदीत देण्यात आलेले गिफ्ट टॅक्स फ्री असते. पण काही वेळा त्यावर कर लागतो. दिवाळी गिफ्ट्सविषयी जे नियम आहेत, त्याबाबत ITR फायलिंग करताना कोणतीही माहिती लपवू नका.

दिवाळीचे गिफ्ट्स टॅक्स-फ्री?

काही वृत्तानुसार, दिवाळीतील सर्वच गिफ्ट्स टॅक्स फ्री नसतात. छोट्या भेट वस्तू जशा की मिठाईचा बॉक्स, कपडे वा 5,000 रुपयांपर्यंतच्या इलेक्टॉनिक वस्तू कर मुक्त असतात. पण 5,000 रुपयांपेक्षा महागडी गिफ्ट्स यामध्ये ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, व्हाऊचर्स यावर मात्र कर लागतो. या गिफ्ट्सचे एकूण मूल्य हे कर्मचाऱ्याच्या वार्षिक उत्पनात जोडल्या जाते. त्यावर वेतनाप्रमाणे कर लावण्यात येतो.

कर सल्लागारानुसार, 5,000 रुपयांपेक्षा अधिक दिवाळी बोनस कराच्या परिघात येते. त्यामुळे हे बोनस उत्पन्नासोबत जोडावे लागेल. 5,000 रुपयांपेक्षा अधिक दिवाळी बोनस मिळाले तर त्याची माहिती आयटीआर भरताना न दिल्यास त्याचा फटका बसेल. आयकर खात्याकडून याविषयीची विचारणा होऊ शकते. नोटीसही मिळू शकते.

रोखीतील बोनसवर लागेल कर

तज्ज्ञांच्या मते जर कंपनी दिवाळी सणाच्या निमित्ताने तुम्हाला रोखीत बोनस देण्यात आले असेल तर त्यावरही कर लागेल. हे बोनस तुमच्या वेतनाचाच भाग मानण्यात येईल. समजा कंपनीने कर्मचाऱ्याला 30 हजार रुपेय बोनस दिला. तर हे बोनस कर्मचाऱ्याच्या उत्पन्नाचा भाग असेल. त्यावर तुमच्या स्लॅबप्रमाणे कर लागेल. दिवाळीनिमित्ताने रोखीतील बोनसवर करातून कोणतीही सवलत, सूट मिळणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दिवाळीचे बोनस, गिफ्ट मिळत असले तरी ते कराच्या परिघात येणार का, याची शहानिशा करा. तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?