AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज घेताना तुम्ही देखील ही चूक करता? कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी वापरा ही ट्रिक

क्रेडिट कार्ड किंवा झटपट कर्जाच्या जमान्यात, लोकं अनेकदा कर्ज घेऊन अडकतात. गरज नसताना देखील लोकं जास्त कर्ज घेतात. ज्यामुळे तुमचा वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा बोजा वाढत जातो. पण तुम्ही जर ही वेळीच नियंत्रणात आणले तर तुम्हाला यातून लवकर बाहेर येता येऊ शकते.

कर्ज घेताना तुम्ही देखील ही चूक करता? कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी वापरा ही ट्रिक
| Updated on: Sep 16, 2024 | 6:13 PM
Share

महागाई वाढत असताना लोकं घर घेण्यासाठी, लग्नासाठ किंवा इतर वस्तू घेण्यासाठी देखील कर्ज घेतात. पण अनेक वेळा विचार न करता घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा वापर तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आम्ही तुम्हाला आज अशाच काही टिप्स सांगणार आहोत, जे तुम्हाला कर्जाच्या भोवऱ्यातून बाहेर काढण्यात मदत करू शकतात. तुम्ही कर्ज घेता तेव्हा बँक किंवा एजंट तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना सांगतात. ज्यामध्ये तुम्हाला जास्त कर्ज घेतले तर व्याजदर कमी मिळेल. जास्त कालावधीसाठी कर्ज घेतले तर व्याज कमी असेल. अशा अनेक गोष्टी सांगत असतात. परंतु तुम्हाला आवश्यक तेवढेच कर्ज घेतले पाहिजे. जर तुम्ही आधीच कर्जाचा EMI भरत असाल तर दुसरे कर्ज घेणे टाळले पाहिजे.

उत्पन्न, कर्ज आणि बचत सेट करा

जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर सर्वप्रथम तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि बचत निश्चित केली पाहिजे. तुम्हाला खर्चाची मर्यादा निश्चित करावी लागेल आणि पैसे खर्च करताना योजना तयार करावी लागेल. ही यादी तयार करताना कोणत्या कर्जावर किती व्याज आकारले जात आहे हे देखील टाकावे. उदाहरणार्थ, गृह कर्ज हे वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डपेक्षा कमी व्याज आकारते. त्यामुळे लवकरात लवकर वाढीव व्याजासह कर्जाची पुर्तता करण्यावर प्रथम लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ईएमआयचे ओझे टाळण्यासाठी तुम्ही प्री-पेमेंटचा पर्यायही निवडू शकता. तुमची बचत वाढवून तुम्ही वार्षिक 10 टक्क्यांनी EMI वाढवू शकता. याद्वारे तुम्ही ६५ टक्के व्याज वाचवू शकता.

तुम्ही रि-फायनान्सची पद्धत अवलंबू शकता

ईएमआयचा बोजा कमी करण्यासाठी तुम्ही री-फायनान्सची पद्धत देखील अवलंबू शकता. या अंतर्गत तुम्ही महागड्या कर्जांना स्वस्त दरात रूपांतरित करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेतले असेल, तर तुम्ही गृहकर्ज घेऊन ते कर्ज रद्द करू शकता. कारण गृहकर्जावरील व्याजदर कमी आहेत.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....