AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकार खरोखरच मुद्रा योजनेंतर्गत 2% व्याजाने 5 लाखांचं कर्ज देते? पटापट तपासा

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सरकार फक्त 2% व्याजासह 5 लाखांपर्यंत कर्ज देत आहे. चला तर या मेसेजचे सत्य जाणून घेऊया...

केंद्र सरकार खरोखरच मुद्रा योजनेंतर्गत 2% व्याजाने 5 लाखांचं कर्ज देते? पटापट तपासा
National Pension System
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सरकार फक्त 2% व्याजासह 5 लाखांपर्यंत कर्ज देत आहे. चला तर या मेसेजचे सत्य जाणून घेऊया…

हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य?

व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दावा केला जातोय की, केंद्र सरकार मुद्रा योजनेंतर्गत कमी व्याजदराने कर्ज देत आहे. या मेसेजमध्ये एक नंबरदेखील शेअर केला गेलाय, ज्यावर कर्जासाठी कॉल करावा लागतो.

सरकारने हा मेसेज बनावट असल्याचे सांगितले

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली. पीआयबीने आपल्या ट्विटरवरून इशारा दिला आहे की, सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे.

चला जाणून घेऊया पीएम मुद्रा योजना काय?

मुद्रा योजनेंतर्गत हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येईल. योजनेंतर्गत कोणतेही निश्चित व्याजदर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याजदर 12%आहे.

या योजनेमध्ये 3 प्रकारच्या कर्जाचा समावेश

1. शिशु कर्ज: शिशु कर्जांतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 2. किशोर कर्ज: 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज किशोर कर्जाखाली दिले जाते. 3. तरुण कर्ज: तरुण कर्जाच्या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

तुमच्या मोबाईलमध्ये ‘Govt Yojana’चा हा मेसेज आलाय

जर तुमच्या मोबाईलमध्ये ‘Govt Yojana’च्या नावाने मेसेज आला असेल तर तुम्हाला त्वरित सतर्क झाले पाहिजे. कारण या मेसेजद्वारे तुम्ही फसवणुकीचे शिकार होऊ शकता. सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकारी योजनेंतर्गत तुमच्या खात्यात 2.67 लाख रुपये जमा झालेत. ऑनलाईन फसवणूक करणारे स्मार्टफोन वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, त्यासाठी तो रोज नवनवे मार्ग शोधतो. आता अशाच फसवणुकीसंदर्भात PIB ने इशारा जारी केलाय.

संबंधित बातम्या

ITR Filing- करदात्यांना दिलासा! सरकार ITR भरण्याची तारीख वाढवण्याच्या तयारीत, कारण काय?

तुमच्या मोबाईलमध्ये ‘Govt Yojana’चा हा मेसेज आलाय, मग व्हा सावध अन्यथा…!

Does the central government really provide loans of Rs 5 lakh at 2% interest under Mudra Yojana? Check it out

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.