शेअर बाजारात घसरणीचे सत्र: सेन्सेंक्समध्ये 656 अंकांची घसरण, निफ्टी 18 हजारांखाली

| Updated on: Jan 19, 2022 | 6:07 PM

सेन्सेंक्स आणि निफ्टी एक टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. आयटी, फायनान्शियल्स सर्व्हिस आणि एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स वर 23 आणि निफ्टीमध्ये 35 स्टॉक्सची कामगिरी सरासरी राहिली.

शेअर बाजारात घसरणीचे सत्र: सेन्सेंक्समध्ये 656 अंकांची घसरण, निफ्टी 18 हजारांखाली
शेअर बाजार
Follow us on

नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय बाजारातील घडोमोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (SHARE MARKET UPDATE) दिसून आला. आज (बुधवार) सेन्सेंक्स आणि निफ्टी एक टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. आयटी, फायनान्शियल्स सर्व्हिस आणि एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स वर 23 आणि निफ्टीमध्ये 35 स्टॉक्सची कामगिरी सरासरी राहिली. आज सेन्सेंक्स 654.04 अंकांच्या घसरणीसह 60,098.82 आणि निफ्टी 174.65 अंकांच्या घसरणीसह 17,938.40 वर बंद झाला. काल (मंगळवारी) सेन्सेंक्स आणि निफ्टी सरासरी 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले होते. सेन्सेंक्स 554.05 अंकांच्या घसरणीसह 60,754.86 आणि निफ्टी 195.05 अंकांच्या घसरणीसह 18,113.05 अंकांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय अर्थजगतात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. अमेरिकन फेड रिझर्व्हने (AMERICAN FED RESERVE) व्याजदरात बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शेअर्स बाजारात अनिश्चितेचं सावट राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

आजचे टॉप गेनर्स:

1. ओएनजीसी (3.97%)

2. टाटा मोटर्स (1.97%)

3. कोल इंडिया (1.91%)

4. स्टेट बँक ऑफ इंडिया (1.78%)

5. हिंदाल्को (1.77%)

आजचे घसरणीचे शेअर्स

1. इन्फोसिस (-2.80)

2. एशियन पेंट्स (-2.77)

3. श्री सिमेंट (-2.77)

4. एचयूएल (-2.52)

5. ग्रॅसिम (-2.47)

आजच्या मार्केटचे टॉप अपडेट्स

· निफ्टी बँक 169 अंकांच्या घसरणीसह 38,041; मिडकॅप इंडेक्स 18 अंकांनी गडगडले 31,363 वर बंद.

· बजाज फायनान्स मध्ये घरसण

· बजाज ऑटो अप, HUL,आशियन पेंट्स डाउन

· निफ्टीमध्ये ओएनजीसीची सर्वोच्च कमाई ठरली

· कोल इंडिया, हिंदाल्को, टाटा मोटर्स,UPL, SBI तेजीत

· श्री सिमेंट, इन्फोसिस, एशियन पेंट्स, HUL,अदानी पोर्टस सर्वाधिक घसरणीचे ठरले

· सिमेंट सेक्टरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, श्री सिमेंट 3% आणि अल्ट्रा टेक 2% घसरण

· जागतिक घसरणीचा आयटीवर प्रभाव कायम, इन्फोसिस 3% घसरण

आंतरराष्ट्रीय पडझडीनंतर तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहार, आशियाई मार्केटमधील तेजी तसेच मार्केटवरील ओमिक्रॉनचं सावट यांचा थेट परिणाम शेअर्स मार्केटवर दिसून येत आहे. आगामी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी दीड आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रस्तावित आर्थिक धोरण तसेच सरकारी बँकेत परकीय गुंतवणूक आदींच्या चर्चांचा परिणाम मार्केटवर जाणवत आहे. बांधकाम क्षेत्रातही विक्री संख्येतील वाढीमुळे तेजीचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

जुग जुग ‘जिओ’!, कालावधी आधीच रिलायन्स जिओने केला स्पेक्ट्रमचा भरणा; दुरसंचार खात्याकडे जमा केले 30,791 कोटी

फरार मल्ल्या लंडनमधील अलिशान बंगल्यातूनही होणार बेदखल, कर्जबुडव्या मल्ल्याला आणखी एक दणका! 

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी