Share Market Opening 19 April : Israel ने इराणवर हल्ला करताच बाजारात हाहाकार; सेन्सेक्स आणि निफ्टीचे वाजले बारा

इस्त्राईलने इराणवर हल्ला चढवताच, शेअर बाजाराने धसका घेतला. भारतीय शेअर बाजारात भूकंप आला. बाजाराला मध्य-पूर्वेतील अस्थिरतेचा मोठा फटका बसला. या युद्धाने आता महागाईला आमंत्रण दिले आहे. सोने आणि चांदीच्या किंमती पण वधारण्याची दाट शक्यता आहे.

Share Market Opening 19 April : Israel ने इराणवर हल्ला करताच बाजारात हाहाकार; सेन्सेक्स आणि निफ्टीचे वाजले बारा
बाजारात जगबुडी, इस्त्राईलच्या हल्ल्याने धरणीकंप
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 10:11 AM

इस्त्राईलने इराणवर हल्ला चढवला. यापूर्वी इराणने इस्त्राईलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्याविरोधात आज इस्त्राईलने आज ताबडतोब कारवाई केली. मध्य-पूर्वेतील या घडामोडींचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला. शेअर बाजारात भूकंप आला. आजच आठवड्यातील शेवटच्या सत्रात बाजार उघडताच भयग्रस्त शेअर बाजाराने नांग्या टाकल्या. शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने साष्टांग लोटांगण घेतले.

सुरुवात झाली कशी?

Sensex ने सकाळी 9 वाजून 15 वाजता व्यापारी सत्र सुरु होताच 550 अंकाची आपटी खाल्ली. सेन्सेक्स 72 हजार निच्चांकावर उघडला. तर त्यानंतर त्यात मोठी पडझड सुरु झाली. सुरुवातीच्या टप्प्यात सेन्सेक्स 71,850 अंकांपेक्षा खाली घसरला. निफ्टी 200 अंकांच्या नुकसानीसह 21,795 अंकावर व्यापार करत होता. सकाळी 10 वाजता बाजार 294.23 अंकांच्या घसरणीसह 72,187 अंकांवर व्यापार करत होता. तर निफ्टी 102 अंकांच्या घसरणीसह 21,898 अंकांवर व्यापार करत होता.

हे सुद्धा वाचा

घसरणीचे अगोदरच संकेत

इराणच्या हल्ल्याचा इस्त्राईल बदला घेणार हे निश्चित होते. त्यानुसार, बाजारात घसरणीचे संकेत अगोदरच होते. सकाळी निफ्टीचा वायदा 300 अंकांनी घसरलेला होता. प्री-ओपन सेशनमध्येच बाजाराची चाल काय असणार हे स्पष्ट होते. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी आज कोणतीच घाई केली नाही. अंदाजानुसार, बाजाराने तात्काळ प्रतिक्रिया दिली.

गुंतवणूकदारांना कसली भीती?

Israel ने Iran वर हल्ला केला. त्यामुळे मध्य-पूर्वेत आता युद्धाचा भडका उडणार आहे. यापूर्वीच जगावर युक्रेन-रशिया युद्ध सुरु आहे. त्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तर इस्त्राईलने हमासविरोधात पण मोर्चा उघडलेला आहे. त्यात आता हे तिसरे युद्ध सुरु झाले आहे. जर या युद्धात अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनी इस्त्राईलची बाजू उचलून धरली तर रशिया इराणची साथ देणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाकडे सरकत असल्याची भीती बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता भयभीत झाले आहेत.

या हल्ल्याचा जागतिक बाजारावर परिणाम

इस्त्राईलने इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त धडकताच जागतिक बाजारात पण त्याचा परिणाम दिसून आला. आशिया बाजाराला नुकसान सहन करावे लागले. जपानचा निक्की सुरुवातीच्या सत्रात 2 टक्क्यांच्या आसपास खाली आला. तर टॉपिक्स इंडेक्स 1.3 टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियातील कोस्पी बाजारात 1.8 टक्क्यांची घसरण दिसली. तर कोस्डॅकला 1.34 टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागले. हाँगकाँग बाजारात 1 टक्क्यांची घसरण दिसली.

Non Stop LIVE Update
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.