Edible Oil Price: खाद्यतेल स्वस्त, किलोमागे 20 रुपयांपर्यंत घसरण

ब्रँडेड खाद्यतेल त्यांचे दर कधी सुधारतील असे विचारले असता सचिव म्हणाले, "मी तेल उद्योगजकांशी बोललो आहे आणि त्यांनी सांगितले आहे की ते तेलाच्या किमतींमध्ये आणखी सुधारणा करत आहेत." SEA ने त्यांचे वितरक, किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना पुढे जाण्याचा सल्ला दिलाय. जुन्या स्टॉकवरील आयात शुल्कात कपातीचा फायदा ग्राहकांनाही करून देणार आहोत.

Edible Oil Price: खाद्यतेल स्वस्त, किलोमागे 20 रुपयांपर्यंत घसरण
pam oil
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 9:15 PM

नवी दिल्लीः देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती 5 ते 20 रुपयांनी कमी झाल्यात, अशी माहिती अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी दिली. आयात शुल्कात कपात करण्याबरोबरच सरकारने केलेल्या अन्य उपाययोजनांमुळे खाद्यतेलाच्या किमती खाली आल्यात. अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रँडेड तेल कंपन्यांनीही नवीन स्टॉकचे दर सुधारित केलेत. जागतिक किमतीच्या अनुषंगाने देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती वाढल्यात. इंडोनेशिया, ब्राझील आणि इतर देशांमध्ये जैवइंधनासाठी खाद्यतेलाचा वापर झाल्यानंतर खाद्यतेलांची उपलब्धता कमी झाली, ज्यामुळे किमती वाढल्यात.

‘खाद्य तेलाच्या किमतीत पुरेशी घसरण’

पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ग्राहकांना चढ्या किमतींपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारने अनेक पावले उचललीत. 167 केंद्रांवर त्याचा प्रभाव शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 5 रुपये ते 20 रुपये प्रति किलोच्यादरम्यान मोठी घसरण झाली. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये किरकोळ पाम तेलाचे दर 3 नोव्हेंबरला 139 रुपये प्रति किलोवरून 6 रुपयांनी घसरून 133 रुपये प्रति किलो झाले, तर उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये ते 140 रुपये प्रति किलोवरून 18 रुपयांनी घसरून 122 रुपये झाले. तर कुड्डालोर, तामिळनाडू येथे ते 7 रुपयांनी कमी होऊन 125 रुपये प्रति किलोवर आले. ते म्हणाले की, शेंगदाणा तेलाच्या किरकोळ किमतीतही 5-10 रुपये प्रति किलो, तर सोयाबीन तेल 5-11 रुपये आणि सूर्यफूल तेल 5-20 रुपये प्रति किलोने 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान घसरले. सरकार देशभरातील 167 केंद्रांवरून सहा खाद्यतेलाच्या किरकोळ किमतींवर लक्ष ठेवते.

मोहरीच्या तेलाच्या दरात लक्षणीय घट नाही

मोहरीच्या तेलाच्या संदर्भात सचिव म्हणाले, “आम्ही किमतींमध्ये लक्षणीय घट पाहिली नाही,” परंतु आयात शुल्काच्या तर्कसंगतीकरणासह सरकारने उचललेल्या पावलांचा मोहरीच्या तेलाच्या किमतीवरही परिणाम होईल. ते म्हणाले, “आम्ही मोहरीच्या तेलाच्या दरातही घसरण पाहणार आहोत.” गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या मोहरीचा पेरा चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, रब्बी पीक मोहरीचे पेरणीचे क्षेत्र एक वर्षापूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत 11 टक्के चांगले आहे.

तेलाच्या किमतींमध्ये आणखी सुधारणा

ब्रँडेड खाद्यतेल त्यांचे दर कधी सुधारतील असे विचारले असता सचिव म्हणाले, “मी तेल उद्योगजकांशी बोललो आहे आणि त्यांनी सांगितले आहे की ते तेलाच्या किमतींमध्ये आणखी सुधारणा करत आहेत.” SEA ने त्यांचे वितरक, किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना पुढे जाण्याचा सल्ला दिलाय. जुन्या स्टॉकवरील आयात शुल्कात कपातीचा फायदा ग्राहकांनाही करून देणार आहोत.

सणासुदीच्या काळात घाऊक किमती प्रति लिटर 4-7 रुपयांनी कमी

एका सरकारी निवेदनात म्हटले आहे की, अदानी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी घाऊक किमती प्रति लिटर 4-7 रुपयांनी कमी केल्यात. खाद्यतेलाच्या घाऊक किमती कमी करणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅचरल्स, दिल्ली, गोकूळ री-फॉईल अँड सॉल्व्हेंट, विजय सॉल्व्हेक्स, गोकूळ अॅग्रो रिसोर्सेस आणि एनके प्रोटीन्स यांचा समावेश आहे.

पुढील आठवड्यात स्टॉक मर्यादेचे पुनरावलोकन होणार

सचिव म्हणाले की, जागतिक खाद्यतेलाच्या किमती गेल्या दहा दिवसांत उच्च पातळीवर राहिल्यात, परंतु आयात शुल्कात कपात करणे आणि साठेबाजी रोखण्यासाठी स्टॉक मर्यादा लादणे यासारखी इतर पावले देशांतर्गत किमती खाली आणण्यास मदत करतील. पांडे म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याचा स्थानिक खाद्यतेलाच्या किमतींवरही मोठा परिणाम होईल, कारण वितरण खर्च कमी होईल. सध्या उत्तर प्रदेश सरकारने किमतींना आळा घालण्यासाठी घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांवर 25 टन साठा मर्यादा निश्चित केली. आणखी तीन राज्ये साठा मर्यादा लागू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. सचिव म्हणाले की, केंद्र पुढील आठवड्यात राज्य सरकारांसोबत स्टॉक मर्यादेच्या स्थितीचा आढावा घेईल. संबंधित बातम्या

30 नोव्हेंबरनंतर ‘या’ योजनेंतर्गत मोफत रेशन मिळणार नाही, सरकारनं सांगितले ‘कारण’

DL, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि रेशन कार्डसह ‘या’ कामांसाठी आता कोविड सर्टिफिकेट आवश्यक

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.