Alert | नोकरदारांनो लक्ष द्या! EPFOमध्ये ‘ही’ कागदपत्र जमा करणे आवश्यक, अन्यथा व्याजाला मुकाल!

बँक खात्यापासून भविष्य निर्वाह निधी खात्यापर्यंत कोणताही केवायसी करणे फार महत्वाचे आहे. ज्यांचे केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांना ईपीएफओच्या ऑनलाईन सेवेचा लाभ मिळत नाही.

Alert | नोकरदारांनो लक्ष द्या! EPFOमध्ये ‘ही’ कागदपत्र जमा करणे आवश्यक, अन्यथा व्याजाला मुकाल!
ईपीएफओ

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोंदणी केलेल्या सुमारे 40 लाख लोकांना व्याज दिले गेले नाहीय. ईपीएफओने यामागील कारण सांगताना केवायसी जुळत नसल्याचे सांगितले आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी सरकारने 2019-20 साठी निश्चित व्याज जाहीर केले होते. यामुळे, ईपीएफओ पुन्हा चर्चेत आले आहे. तथापि, यापूर्वी व्याज देयकास उशीर केल्याबद्दल देखील ईपीएफओ चर्चेत आले होते. ईपीएफओमध्ये केवायसी करणे का महत्वाचे आहे आणि त्यापासून आपल्याला काय फायदा होतो, हे जाणून घेऊया…(Employee provident fund EPFO latest update how can update KYC in pf account)

बँक खात्यापासून भविष्य निर्वाह निधी खात्यापर्यंत कोणताही केवायसी करणे फार महत्वाचे आहे. ज्यांचे केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांना ईपीएफओच्या ऑनलाईन सेवेचा लाभ मिळत नाही. पीएफ खात्यांमधून केवायसीशिवाय पैसे काढता येणार नाहीत. केवायसी नसेल तर ई-सेवा पोर्टलच्या बर्‍याच ऑनलाईन सेवांचा लाभ ईपीएफओ सदस्यांना घेता येणार नाही. यात पैसे क्लेम करणे, खाते हस्तांतरण, नॉमिनेशन यासारख्या सेवांचा समावेश आहे.

ज्या खात्यात केवायसी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना पैसे हस्तांतरण किंवा पैसे काढताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आपल्या पीएफ खात्यात, बँक खात्याची माहिती अद्यतनित न केल्यास, तुमचा क्लेमदेखील नाकारला जाऊ शकतो. जर आपण केवायसीची कागदपत्रे सबमिट केली नसतील, तर ईपीएफ सदस्यांना मिळणाऱ्या सूचना तुम्हाला एसएमएसद्वारे प्राप्त होणार नाही.

घर बसल्या केवायसी कशी कराल?

आपल्या यूएएन नंबरमध्ये केवायसी करण्यासाठी आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपली केवायसी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकता. यासाठी यूएएन पोर्टलवर जा आणि केवायसीच्या पर्यायावर क्लिक करा. समोर उघडलेल्या विंडोमध्ये पॅन, आधार, मोबाईल नंबर, बँक खाते असलेल्या विभागावर क्लिक करा. त्यात आपली माहिती भरा आणि सबमिट करा. आता आपले पॅन आणि आधार त्यात जोडले जातील. परंतु, ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला आपल्या एम्प्लॉयरला सूचित करावे लागेल. एम्प्लॉयर पडताळणी होताच आपण ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असाल (Employee provident fund EPFO latest update how can update KYC in pf account).

केवायसीसाठी ईपीएफओ पोर्टलवर ‘ही’ कागदपत्रे अपलोड करा

यासाठी खातेधारकाला बँक खाते, पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स-निवडणूक कार्ड- रेशन कार्ड- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (यापैकी एक) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जर आपले केवायसी पूर्ण झाले असेल, तर ईपीएफओ केवळ तीन दिवसात आपल्या पीएफ पैसे काढण्याच्या क्लेमवर प्रक्रिया करेल. यानंतर पीएफचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील.

पीएफ सेवेसंदर्भात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 2014मध्ये ईपीएफओने भागधारकांना 12 अंकी यूएएन क्रमांक जारी केला होता. आता सर्व खाती यूएएनशी जोडली गेली आहेत. त्यातून भविष्यात EPFO संबंधित कोणतीही माहिती मिळू शकते. तसेच, संपूर्ण सेवा इतिहास देखील यात जोडला गेला आहे.

(Employee provident fund EPFO latest update how can update KYC in pf account)

हेही वाचा :