EPF खात्याला आधार कार्डसोबत लिंक करा, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावं लागणार

कर्मचारी भविष्य निधी (EPF) खात्याला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. EPF Account link Aadhaar card

EPF खात्याला आधार कार्डसोबत लिंक करा, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावं लागणार
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 4:38 PM

नवी दिल्ली: आजकाल अनेक सरकारी कामांमध्ये आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक असते. आता कर्मचारी भविष्य निधी (EPF) खात्याला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. ईपीएफोनं आधार कार्ड ईपीएफ खात्याला जोडण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आधार लिंक केलेले नाही त्यांनी ते करुन घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या ईपीएफ खात्यात पैसे जमा होणार नाहीत. ईपीएफ खात्यातील पैसे काढताना देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. (EPF Account link Aadhaar card otherwise employers contribution will not credited in account know details)

ईसीआर सुविधा मिळणार नाही

आधारकार्ड ईपीएफ खात्याला लिंक न केल्यामुळं खातेधारकांना इलेक्रट्रॉनिक चलन रिटर्न ही सुविधा वापरता येणार नाही. कारण, ही सुविधा आधार कार्ड लिंक असणाऱ्या खातेधारकांना वापरता येणार आहे. ज्यांचं ईपीएफ खाते आधारशी लिंक नाही ते युएएन क्रमांक आधार कार्ड पडताळणी करता येणार नाही. यामुळे खातेधारकांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार नाहीत. 1 जूनपासून आधार कार्ड ईपीएफ खात्याला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?

स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.

ईपीएफओने काय म्हटलं?

ईपीएफओने याबाबतची अधिसूचना जारी केली होती. त्यात 1 जूनपर्यंत पीएफ खात्याशी आधार लिंक करण्यास सांगितलं होतं. तसं न केल्यास 1 जूनपासून ईसीआर भरला जाणार नाही. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे पीएफ खाते आधारशी लिंक नसेल तर कंपनी आणि कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

संबंधित बातम्या:

7th Pay Commission : दहा हजार ग्रेड पे सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2.88 लाखाचं नुकसान

SBI, HDFC, ICICI : 30 जूनची डेडलाईन लक्षात ठेवा, अन्यथा FD अधिक लाभांश नाही मिळणार

मे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली

(EPF Account link Aadhaar card otherwise employers contribution will not credited in account know details)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.