AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Nominees Alert | EPFO चं नवीन अपडेट कळालं का? नाहीतर 7 लाख रुपये जातील हातचे

EPFO Nominees Alert | EPFO चं नवीन अपडेट कळालं का? ऑनलाईन खात्याला लॉगिन केल्यावर तुम्हाला लागलीच ही सूचना दिसते. त्याचं पालन नाही केलं तर तुमचे 7 लाखांचे नुकसान होऊ शकते.

EPFO Nominees Alert | EPFO चं नवीन अपडेट कळालं का? नाहीतर 7 लाख रुपये जातील हातचे
तर सात लाखांचे नुकसानImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 13, 2022 | 2:39 PM
Share

EPFO Nominees Alert | भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) ऑनलाईन खाते तुम्ही कधी लॉगिन (Log In) केले होते? आठवते का? नसेल तर आता खाते लॉगिन करुन पहा. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पहिलाच संदेश दिसेल. हा संदेश आहे वारसदाराच्या नावाचा, तुम्ही नॉमिनेशन केले नसेल तर ते त्वरीत करुन घ्या. वारस जोडले असतील आणि त्यात आता तुम्हाला बदल करायचा असेल अथवा त्यांच्या योगदानात बदल करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. यापूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई-नॉमिनेशनसाठी (E-Nomination) 31 मार्च ही शेवटची तारीख ठेवली होती. ई-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण न केल्यास काय नुकसान होऊ शकते, याची माहिती ईपीएफओने दिली आहे. ई-नॉमिनेशन करतात, त्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती आणि ई-नॉमिनेशन न केल्यास काय नुकसान होऊ शकते, याची माहिती आपण घेऊयात.

असे जोडा वारस

सध्या तुम्ही ईपीएफओच्या पोर्टलवर लॉगिन केल्यास लागलीच याविषयीची सूचना दिसते. त्यामुळे त्यावर क्लिक केल्यास तुम्ही या सेवेत हवा तो बदल करु शकता. तसेच ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्यात्यानंतर  ‘Service’ हा पर्याय निवडापुढे  ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक कराआता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा.  सॅलरी स्लीप (Salary Slip) वरही हा क्रमांक असतो. ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करानॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडात्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा family declaration  या पर्यायावर या  ‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा’Nomination Details’ हा कॉलम तर अधिक काळजीपूर्वक भरा ‘Save EPF Nomination’ हा पर्याय अंतिम टप्प्यातील आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर हा पर्याय समोर येतो.’E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी आधार कार्डशी लिंक असेल.ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

काय होईल नुकसान

EPFO नुसार, तुम्ही वारसदाराचे नाव जोडले नसेल तर पीएफ रक्कम खात्यात अडकू शकते. खातेदाराने ई-नॉमिनेशन फॉर्म भरला नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून रक्कम काढू शकत नाही. दावा दाखल करण्यापूर्वी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास दाव्याचा ही निपटारा (Claim Settlement)  होणार नाही. EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा असते.  एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा मिळतो. या विमा योजनेत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते. जरविना वारसदार पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. मग वकिलाची मदत घेऊन न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. त्यात पैसा आणि वेळ वाया जाईल आणि मनस्ताप होईल तो वेगळा.

खात्यातील शिल्लकी तपासता येणार नाही

ई-नॉमिनेशन न केल्यास पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची गोष्ट दूरच राहिली, तुम्हाला पासबूकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, हे तपासता येणार नाही. पीएफ खात्याचे विवरणपत्र बघता येणार नाही.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...