5

ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; ‘असे’ चेक करा आपले बॅलन्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)ने 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 23.44 कोटी खातेदारांच्या खात्यामध्ये 8.50 टक्के व्याजदराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ईपीएफओकडून व्याजदराची घोषणा करण्यात आली होती.

ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; 'असे' चेक करा आपले बॅलन्स
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 2:44 PM

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)ने 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 23.44 कोटी खातेदारांच्या खात्यामध्ये 8.50 टक्के व्याजदराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ईपीएफओकडून व्याजदराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता 8.50 टक्के व्याजदराने व्याज जमा केल्याची माहिती देण्यात आली आहे.

ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही खासगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून चालवण्यात येणारी एक योजना आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या जमा रकमेवर विशिष्ट व्याज देण्यात येते. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच ईपीएफओने आपल्या काही नियमांमध्ये बदल केले होते. नव्या नियमानुसार आता यूएएन नंबरला जर तुमचा आधार नंबर लिंक असेल तर तुमच्या पीएफ खात्यामध्ये पैसे जामा होणार आहेत. ईपीएफओकडून यूएएनला आधार लिंक करण्यासाठी एक डिसेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली होती, आता त्याची मुदत संपली आहे. अजूनही ज्या लोकांनी यूएएनला आधार लिंक केले नसेल तर त्यांनी करून घ्यावे, असे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून करण्यात आले आहे.

‘अशी’ मिळवा आपल्या पीएफ खात्यातील पैशांची माहिती

पीएफ खात्यावर किती पैसे आहेत, किती व्याज जमा झाले आहे, याची माहिती मिळवण्याची प्रक्रिया तशी थोडी किचकट असते. मात्र आता ईपीएफओने एसएमएस आणि मिसकॉलच्या माध्यमातून देखील ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. जर तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून तुमच्या खात्याची माहिती मिळवायची असेल तर मोबाईलच्या संदेश बॉक्समध्ये जाऊन EPFOHO असे टाईप करून त्यापुढे तुमचा यूएएन नंबर टाका आणि 738299899 या नंबरला एसएमएस सेंड करा, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल. किवा तुमच्या पीएफ खात्याशी तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावरून 011-22901406 या नंबरला मिसकॉल दिल्यानंतर देखील तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते.

संबंधित बातम्या 

एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, दहा वर्षात मिळवा डबल

मद्यप्रेमींसाठी खुशखबर; नववर्ष, ख्रिसमसला मिळणार स्वस्त दारू

Non Stop LIVE Update
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...