AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO ने 6.5 कोटी खातेदारांच्या खात्यात पाठवले PF व्याज, जाणून घ्या कसे तपासायचे?

जर तुमचा UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुमचे नवीन योगदान आणि PF शिल्लक माहिती मेसेजद्वारे प्राप्त होऊ शकते, यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता.

EPFO ने 6.5 कोटी खातेदारांच्या खात्यात पाठवले PF व्याज, जाणून घ्या कसे तपासायचे?
money
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 10:30 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 6.5 कोटी जनतेला दिवाळीची मोठी भेट दिली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निर्वाह निधी सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली. तुम्हाला हे पैसे आतापर्यंत मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तुमचे पीएफ खातेदेखील तपासून जाणून घेऊ शकता. तुम्ही घरबसल्या तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक तपासू शकता.

व्याज किती मिळणार?

2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने यापूर्वीच हिरवा सिग्नल दिला होता. कामगार आणि रोजगार मंत्रालयानेही या निर्णयाला सहमती दर्शवली होती. आता EPFO ​​ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा भविष्य निर्वाह निधी कापला गेला असेल, तर तुम्ही 4 सोप्या मार्गांनी तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

मिस कॉलद्वारे जाणून घ्या

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर EPFO ​​कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल, यासाठी बँक खाते, पॅन आणि आधार UAN शी लिंक असणे आवश्यक आहे.

एसएमएसद्वारे जाणून घ्या

जर तुमचा UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुमचे नवीन योगदान आणि PF शिल्लक माहिती मेसेजद्वारे प्राप्त होऊ शकते, यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. हा एसएमएस UAN च्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून पाठवावा लागेल.

EPFO च्या माध्यमातून पैसे कसे मिळवाल?

यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे Employee Centric Services वर क्लिक करा. आता View Passbook वर क्लिक करा. पासबुक पाहण्यासाठी UAN ने लॉगिन करा.

उमंग अॅपद्वारे शिल्लक तपासा

तुमचे उमंग अॅप (Unified Mobile Application for New age Governance) उघडा आणि EPFO ​​वर क्लिक करा. दुसर्‍या पृष्ठावर कर्मचारी केंद्रित सेवांवर क्लिक करा. येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

संबंधित बातम्या

NPS मध्ये कोणी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हे आहेत देशातील सर्वात मोठे दानशूर, दररोज 27 कोटी रुपयांचं दान, पाहा यादी

EPFO sends PF interest to 6.5 crore account holders know how to check?

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.