AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: नोकरीत पूर्ण झाली 17 वर्षे, मग ही सुवर्णसंधी सोडू नका, PF नव्हे तर अनेक योजनांचा लाभ मिळणार

EPFO Enrolment Campaign : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशातील लाखो कर्मचार्‍यांसाठी एक खास संधी आणली आहे. ज्यांना नोकरीत 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना नोंदणीनंतर PF नव्हे तर अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.

EPFO: नोकरीत पूर्ण झाली 17 वर्षे, मग ही सुवर्णसंधी सोडू नका, PF नव्हे तर अनेक योजनांचा लाभ मिळणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना
| Updated on: Sep 05, 2026 | 1:58 PM
Share

केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) काही मोठ्या कारणांमुळे सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी संधी आणली आहे. कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या परीघात आणण्यासाठी कर्मचारी नोंदणी मोहिमेची (ईईसी) सुरूवात केली आहे. हे खास अभियान येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या स्पेशल ड्राईव्हतंर्गत कंपनी, मालकांना त्यांच्या पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करता येणार आहे. त्यांना त्यासाठी एक खास संधी देण्यात येणार आहे.

कोणाला होणार फायदा?

ही मोहिम त्या कर्मचाऱ्यांसाठी खास आहे जे 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या दरम्यान EPF कव्हरेजसाठी पात्र होते. पण काही कारणांमुळे त्यांची नाव नोंदणी झाली नाही. या मोहिमेतंर्गत ईपीएफओकडे नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 ही निश्चित केली आहे. या मोहिमेचा उद्देश पात्र कर्मचाऱ्यांना पीएफसोबतच पेन्शन आणि विम्याचा लाभ देणे हा आहे. या मोहिमेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जर कर्मचार्‍याचे योगदान यापूर्वी नियोक्त्याने, कंपनीने वसूल केले नसले तर 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी कर्मचार्‍याचा हिस्सा पूर्णपणे माफ केला जाणार आहे.

UMANG ॲपद्वारे ऑनलाईन घोषणा करणे आवश्यक

कर्मचाऱ्यांना UMANG ॲपद्वारे ऑनलाईन घोषणा करणे आवश्यक आहे. प्रादेशिक आयुक्त प्रशांत कुमार यांनी याविषयीची माहिती दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीने UMANG मधील ‘फेस ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून UAN ची (युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक) नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन घोषणा करणे आवश्यक आहे.

EPF क्लेमला उशीरा झाल्यास काय कराल?

ऑनलाईन EPF दावे सात ते दहा दिवसात निपटारा होतात. त्यासाठी कर्मचार्‍याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असणे अत्यंत आवश्यक आहे. जर 20 दिवसांच्या आत क्लेम प्रोसेस झाले नाही तर सदस्य EPFiGMS पोर्टलवर याविषयी तक्रार दाखल करू शकतात. नवीन नियमानुसार, जर एखाद्या कारणामुळे वेळोवेळी जास्त उशीर होत असेल तर संबंधित अधिकार्‍याला वार्षिक 12% दराने व्याजाचा दंड बसू शकतो. तर येत्या दिवसात ईपीएफओ अधिक सुलभ आणि सुटसुटीत होणार आहे.

Follow Us
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध