AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Forex Reserves : जबरदस्त, अमेरिका-इराण यु्द्धातही भारताची कमाल, परकीय चलन साठा ऑल टाइम हाय

India Forex Reserves: भारतीय विकास वृद्धी दरावरून (GDP) सध्या वादळ उठले आहे. त्याचवेळी परकीय गंगाजळीद्वारे सरकारने विरोधकांना करारा जवाब दिला आहे. जागतिक संकट असताना, इराण-अमेरिका युद्धाच्या सावटातही भारताने मोठी मजल मारली आहे. काय आहे याविषयीची वित्तंबातमी?

India Forex Reserves : जबरदस्त, अमेरिका-इराण यु्द्धातही भारताची कमाल, परकीय चलन साठा ऑल टाइम हाय
परकीय चलन साठा ऑल टाइम हाय Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 05, 2026 | 7:26 AM
Share

भारताचा परकीय चलनसाठ्याने 28 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 11.475 अब्ज डॉलरहून आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी झेप घेतली. देशाची परकीय गंगाजळी ऑल टाईम हायवर 740.803 अब्ज डॉलरवर (India foreign reserves) पोहचली. शुक्रवारी भारतीय केंद्रीय बँक, रिझर्व्ह बँकेना हा विषयीचा डेटा, आकडेवारी दिली. भारताच्या विकास वृद्धी दरावरून (GDP) मोठा गदारोळ सुरू असताना सरकारने कामगिरीतून विरोधकांना उत्तर दिल्याचे मानले जात आहे. या वित्तंबातमीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही दिसू शकतो. शुक्रवारी NSE, BSE हे वधारले. सोमवारी शेअर मार्केटमध्ये तेजीचे सत्र दिसू शकते.

परकीय गंगाजळीत मोठी वाढ

RBI च्या आकडेवारीनुसार, 28 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली. यामध्ये फॉरेन करन्सी ॲसेटचे (FCA) मूल्य 9.337 अब्ज डॉलरवरून 600.670 अब्ज डॉलर इतके झाले. एफसीएमध्ये डॉलरसह जगातील महत्त्वाचे चलन जसे येन, युरो आणि पाऊंड यांचा समावेश होतो. त्यांचे मूल्य हे नेहमी डॉलरमध्ये दाखवले जाते. यापूर्वी भारताची परदेशी गंगाजळी सर्वकालीन उच्चांकी 729.328 अब्ज डॉलर इतकी होती. ती 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात नोंदवली गेली होती.

सोन्याच्या साठ्यातही वाढ

परकीय चलनसाठ्यातील दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक गोल्ड रिझर्व्हचे मूल्य 2.191 अब्ज डॉलर वाढून 116.409 अब्ज डॉलर इतके झाले आहे. आरबीआयनुसार, 28 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात SDR चे मूल्य 43 दशलक्ष डॉलरने घटून 18.810 अब्ज डॉलर इतके झाले आहे. आरबीआयच्या राखीव निधीत घट झाली आहे. 11 दशलक्ष डॉलरची घट होऊन हा साठा 4.914 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. परकीय चलन साठा वाढवण्यासाठी केंद्रीय बँकेने अनेक आकर्षक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा परिणामही दिसून आला. भारताच्या परकीय गंगाजळीत जवळपास 136 अब्ज डॉलरची भर पडली आहे. कोणत्याही देशासाठी त्याचा परकीय चलन साठा महत्त्वाचा असतो. यामुळे देशाच्या आर्थिक आरोग्याची स्थिती समजते. आर्थिकदृष्ट्या देशाची क्षमता जगाला समजते.

डॉलरच्या दबावाने रुपयाचे अवमूल्यन होऊ नये यासाठी परकीय गंगाजळी हाताशी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. एखाद्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपयावर मोठा दबाव आला. रुपयाचे मूल्य घसरले. तर रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आणि विनिमय दरात स्थिरता राखण्यासाठी मध्यवर्ती बँक नेहमी त्यांच्या परकीय गंगाजळीचा वापर करतात.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच