
Epstein Files Anil Ambani: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एपस्टीन फाईल्सवर जाहीर भाष्य केले. यावेळी त्यांनी मोदीज ऑन बोर्ड आणि भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचा उल्लेख केला. त्यांनी त्याचवेळी उद्योगपती अनिल अंबानी यांचं नावही घेतलं. अर्थात एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांचा या गुन्ह्याशी अथवा कृत्याशी थेट संबंध असेल असे नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. एपस्टीन हा विकृत होता. त्याने वलय वापरून अनेकांशी संबंध ठेवले होते. हा 300 GB डेटा आहे. त्यातून अनेक खुलासे समोर येतील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
जनतेच्या दबावामुळे माहिती समोर
मी माहिती दिली होती अमेरिकेत काही घटना घडत आहे.जेफ्री एपस्टीन अनेक बाल लैगिंक छळ केला. अमेरिकेच्या दोन्ही खासदाना जेफ्री एपस्टीन प्रकऱणातील माहिती फोटो,व्हिडिओ बाहेर काढव्या लागल्या. गेल्या 30 वर्षाचा हा डेटा आहे.प्रचंढ मोठा पुरावा जेफ्री एपस्टीन प्रकरणात आहे.जनतेच्या दबावामुळे अमेरेकेना सर्व माहिती प्रकाशित करावे असा कायदा केला. त्यावर ट्रम्प यांना कायदा करावा लागला,तीस दिवसांच्या आता ही सर्व माहिती समोर आली पाहिजे असं ठरले. त्या प्रमाणे माहिती समोर येत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
त्या प्रकरणात कोणती माहिती त्याला शोधण्यासाठी वेळ लागले. एपस्टीन फाईलवर सरकारने उत्तर द्यावं.जी माहिती आली आहे त्याता काही भारतीयांचे नाव आहे. पेट्रोलियम मंत्री हरिम पुरू यांचं नाव आहे. एपस्टीन फाईल खुल्या व्हायला अजून वेळ लागेल.300 जीबी डेटा आहे ,95 हजार फोटो आहेत.मोदी ऑन बोर्ड असा संदेश एपस्टीनने ट्रम्प यांच्या सल्लागाराला दिला होता. त्यामुळे एपस्टीन आणि मोदी यांची ओळख काय.मोदींचा संदर्भात हा 2014चा आहे. तो देह व्यापर करतो हे माहिती असतना त्यांच्याशी संपर्का का असा सवाल त्यांनी केला. नाव समोर आल्यावर एकहीही व्यक्ती स्पष्टीकरण देत नाही. त्या माणसाचा ह्यांचा संबंध आला कसा आला हे समोर आले पाहिजे. प्रिन्स अँड्र्यू यांचं सुद्धा नाव आले होते, त्यांच्याविरोध केस झाली होती. मात्र त्यांनी कोट्यावधी देऊन हे प्रकरण बाहेर मिटवण्यात आले होते.इतिहासात कधी एवढ डिस्क्लोजर झाले नव्हेत.ज्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांचे फोटो ब्लर केले आहेत, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
अनिल अंबानी यांचे नाव
दरम्यान याप्रकरणात भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांचं नाव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्याविषयी अधिक काही माहिती त्यांनी दिली नाही. मला ड्रोल करू द्या मला काही फरक पडत नाही.अनिल अंबानी ह्याचं सुद्धा नाव आहे.त्यांना मोदींनी भेटायचं आहे त्यांनी मोदींनी त्यांना भेटायची तयारी दाखवली आहे, असे चव्हाण यांनी म्हणणे मांडले.