AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan: एपस्टिन फाईल्सप्रकरणात भारतातील पहिल्या नेत्याचे नाव उघड, नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा बॉम्ब

Prithviraj Chavan on Epstein Files: अखेर भारताच्या राजकारणावर एपस्टिन फाईल्सचा मोठा भूकंप होणार, याची कुणकुण लागल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे. Modi's on Board असा संदर्भ देत चव्हाण यांनी मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे. काय म्हणाले माजी मुख्यमंत्री?

Prithviraj Chavan: एपस्टिन फाईल्सप्रकरणात भारतातील पहिल्या नेत्याचे नाव उघड, नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा बॉम्ब
पृथ्वीराज चव्हाण एपस्टिन फाईल्स, हरदीप सिंह पुरी, नरेंद्र मोदीImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 20, 2025 | 1:21 PM
Share

Prithviraj Chavan on Epstein Files: अखेर भारताच्या राजकारणात एपस्टीन फाईल्स मोठा भूकंप आणणार अशी शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे. Modi’s on Board असा संदर्भ देत चव्हाण यांनी मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे.त्यांनी भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे नाव घेत मोठा खुलासा केला आहे. आता एपस्टिन प्रकरणात केवळ अंशताः पुरावे समोर आले आहेत. अजून याप्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे होतील. त्यासाठी कदाचित आणखी काही आठवडे जावे लागतील असे सांगत त्यांनी सरकारकडून याविषयी खुलासा का होत नाही, हे सरकारलाच विचारा असा टोलाही लगावला आहे. कराडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्दांवर मत मांडलं आहे.

मोदीज ऑन बोर्ड

हरदीपसिंग पुरी हे भारताचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत होते असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. स्टीव्ह व्हॅलन नावाचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा सल्लागार होता, तो एपस्टीन याला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांनी, मोदींशी भेटायचं आहे. एपस्टीन त्यावर म्हणतो की मी प्रयत्न करतो. मग काही दिवसानंतर तो सांगतो की मोदीज ऑन बोर्ड. म्हणजे मोदी भेटण्यासाठी तयार आहेत, असा तो ई-मेल आहे.मग प्रश्न असा निर्माण होतो की त्याचे आणि मोदींचे संबंध कुठे आणि कसे आले, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. तर मोदींचा संदर्भ 2014 मधील असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

हरदीप पुरी हे न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांची आणि एपस्टीन यांच्या अनेकवेळा भेटीगाठी झाल्याचा उल्लेख आलेला आहे. मी काही सगळी कागदपत्रं तपासली नाहीत. कारण हा 300 GB डेटा आहे.लक्षावधी फोटोग्राफ,लक्षावधी कागदपत्रं, लक्षावधी ई-मेल्स आहेत. या डेट्यात सर्व माहिती काढली जाऊ शकते. पण ते काही सोप्प काम नाही.तर जगातील सर्व मीडियाला आता यापुढे काही आठवडे हेच काम राहिल अशी पुश्तीही त्यांनी जोडली.

विरोधकांची भूमिका काय असेल?

याप्रकरणी भारतीय नेत्यांची नावं समोर येत आहेत, त्याबाबत विरोधी पक्ष, काँग्रेस, इंडिया आघाडी काय भूमिका घ्यायची ते ठरवेल. आता आपल्यासमोर सकृतदर्शनी एक नाव आलेलं आहे. नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला असं गृहीत धरता येणार नाही. पण प्रश्न हा उरतोच की एपस्टीन आणि या नेत्यांचे संबंध कुठे आणि कसे आले असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्याला यापूर्वी 2008-09 मध्ये शिक्षा झाली आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे हे सर्वांनाच माहिती होतं. मोदींचा जो संदर्भ आहे. तो 2014 मधील आहे. एपस्टीन हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे हे माहिती असतानाही, देह व्यापार करतो हे माहिती असतानाही मग अमेरिकेत भारताचे राजदूत असलेल्या हरदीपसिंह पुरी यांचे ही नाव आले आहेत. पण त्यांच्या यामध्ये काही भूमिका आहेत हे सर्व शोधावे लागेल असे पृथ्वीराज बाबा म्हणाले.

मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.