दिवाळीत हा शेअर करणार धमाका; खरेदीसाठी उडाली झुंबड, झुनझुनावालाकडे 3 कोटी तर LIC कडे 8 कोटी शेअर, मग तुम्ही मागे कसे?

Federal Bank Share : या बँकेचा शेअर लवकरच 200 रुपयांच्या घरात असेल. सध्या रेखा झुनझुनावाला यांच्याकडे या बँकेची 3 कोटींहून अधिक तर एलआयसीकडे 8 कोटींहून जास्त शेअर आहेत. कोणती आहे ही बँक? या बँकेचा शेअर खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. तुम्ही घेतला का विकत शेअर?

दिवाळीत हा शेअर करणार धमाका; खरेदीसाठी उडाली झुंबड, झुनझुनावालाकडे 3 कोटी तर LIC कडे 8 कोटी शेअर, मग तुम्ही मागे कसे?
फेडरल बँक शेअर
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 5:10 PM

Federal Bank चा शेअर सध्या चर्चेत आहे. दिवाळीतच या बँकेच्या शेअरने धमाका केला आहे. मंगळवारी या शेअरने गुंतवणूकदारांन मोठा फायदा मिळवून दिला. हा शेअर 29 ऑक्टोबरला 8 टक्क्यांहून अधिक वाढला. इंट्रा डेमध्ये हा शेअर 198.8 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. सप्टेंबर तिमाही निकालाचे परिणाम दिसून आला आहे. या खासगी क्षेत्रातील बँकेने सप्टेंबर तिमाहीत 11 टक्के नफ्याचा रेकॉर्ड केला. बँकेचा निव्वळ नफा 1,057 कोटींच्या घरात पोहचला. बँकेने एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 954 कोटींचा निव्वळ नफा मिळवला होता. शेअर होल्डिंग पॅटर्नप्रमाणे रेखा झुनझुनवालाकडे कंपनीचे 3,45,30,060 म्हणजे एकूण शेअरपैकी 1.42 टक्के तर एलआयसीकडे 8,42,36,556 शेअर म्हणजे 3.47 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. हा शेअर लवकरच मोठी भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या पडल्या आहेत.

बँक कर्जाच्या विळख्यातून हळूहळू बाहेर

फेडरल बँकेने शेअर बाजाराला नवीन अद्ययावत माहिती दिली आहे. त्यानुसार, या तिमाही दरम्यान बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 7,541 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वेळी हा आकडा 6,186 कोटी रुपये इतका होता. बँकेने या तिमाहीत व्याजापोटी 6,577 कोटी रुपये जमा केले तर गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत बँकेला व्याजापोटी 5,455 कोटी रुपये मिळाले होते. बँकेसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे बँकेचा एनपीए घटला आहे. बँकेचा तोटा कमी झाला आहे. वार्षिक आधारावर हा आकडा 2.26 टक्क्यांहून 2.09 टक्क्यांवर आला आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस 0.64 टक्क्यांहून हा आकडा या सप्टेंबर महिन्यात 0.57 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

हे सुद्धा वाचा

अजून इतकी झेप घेणार

ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी फेडरल बँकेच्या शेअरवर विश्वास टाकला आहे. त्यानुसार हा शेअर येत्या काही दिवसांत 242 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 225-50 हा दरम्यान खरेदीचा सल्ला दिला आहे. तर इतर फर्मने या बँकेचा शेअर 235 रुपयांपर्यंत झेप घेण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.