AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SmilePay : नको कॅश, क्रेडिट कार्ड, मोबाईलमधील ॲप, केवळ हसा आणि होईल पेमेंट

SmilePay Payment : बँकेत जाऊन रोख रक्कम काढणे, एटीएममधून डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे आता युपीआय ॲप अशा झटपट पेमेंट पद्धतीमुळे व्यवहार सोपा झाला आहे. पण आता त्यापुढे पाऊल टाकत या बँकेने हसा आणि पेमेंट करा असे नवीन फीचर आणले आहे.

SmilePay : नको कॅश, क्रेडिट कार्ड, मोबाईलमधील ॲप, केवळ हसा आणि होईल पेमेंट
स्माईल पे मुळे झटपट व्यवहार
| Updated on: Sep 03, 2024 | 12:10 PM
Share

तुमचे खाते फेडरल बँकेत असले तर तुमच्यासाठी बँकेने एक खास फीचर आणले आहे. खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेने स्माईल पे (Federal Bank SmilePay) या नावाने फेशियल पेमेंट सिस्टम सुरु केली आहे. यामध्ये ग्राहक कॅमेऱ्याकडे बघून हसल्यास पेमेंट होणार आहे. या सेवेमुळे ग्राहकांना आता रक्कम अदा करण्यासाठी युपीआय वॅलेट, डेबिट, क्रेडिट कार्ड वा इतर आयुधांची गरज उरली नाही. सध्या ही सेवा रिलायन्स रिटेल आणि अनन्या बिर्ला या स्वतंत्र मायक्रो फायनान्सच्या काही शाखांवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सध्या ही सुविधा पथदर्शी प्रकल्पातंर्गत सुरु करण्यात आली आहे. ‘भीम आधार पे’ वर आधारीत या सिस्टममध्ये आधार क्रमांकाशी जोडलेल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बायोमॅट्रिक डाटाचा वापर करण्यात येतो. या फीचरसाठी युआयडीएआय (UIDAI) पूर्णपणे सुरक्षित फेशियल रिकग्निशन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. लवकरच या स्माईल पे योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे.

काय आहे स्माईप पे

फेडरल बँकेने याविषयीची एक माहिती दिली आहे. त्यानुसार, स्माइलपे (SmilePay) ही देशात एक खास प्रकारचे पहिले पेमेंट सिस्टम आहे. हे फीचर युआयडीएआयच्या भीम आधारीत अपग्रेड फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा उपयोग करते. स्माईलपे युझर्सला त्यासाठी अगोदर हसरा चेहरा कॅमेराबद्ध करावा लागतो. त्यानंतर या सुविधेचा लाभ मिळतो. ही सुविधा सुरु झाल्यानंतर ग्राहक हा कार्ड वा मोबाईल वॅलेट विना सहज पेमेंट करु शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या दोन टप्प्यात पूर्ण होते. फेडरल बँकेचे सीडीओ इंद्रनील पंडित या सेवेबद्दल उत्साहित आहेत. कॅश ते कार्ड, क्यूआर कोड आणि आता या नवीन स्माईल पे मुळे पेमेंट करणे हे आनंददायी आणि विस्मयचकित करणारे असेल असा विश्वास व्यक्त केला.

स्माईलपेचा फायदा तरी काय

स्माईलपेच्या माध्यमातून तुम्ही रोख, कार्ड वा मोबाईल वॅलेट शिवाय व्यवहार पूर्ण करु शकाल. या सुविधेमुळे पेमेंट करतानाची प्रक्रिया एकदम सोपी होईल, काऊंटरवरची गर्दी कमी होण्यासाठी पण मदत होईल. UIDAI च्या फेस रिकग्निशन सर्व्हिसेसच्या मदतीने एकदम सुरक्षित आणि विश्वासाने हे पेमेंट करता येणार असल्याचा दावा बँकेने केला आहे. लवकरच ही सेवा ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.