Happy New Year 2021 : नवीन वर्षात घराचं अर्थकारण सांभाळायचं असेल तर ‘हे’ नक्की वाचा!

कधी कुठे आपल्याला पैशांची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यात जर पैसा कमावण्याचं साधनचं नष्ट झालं तर स्थिती आणखी बिकट होते, हे आपल्यापैकी अनेकांनी या काळात अनुभवलं असेल

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:13 AM, 1 Jan 2021
Happy New Year 2021 : नवीन वर्षात घराचं अर्थकारण सांभाळायचं असेल तर 'हे' नक्की वाचा!
कारण, अवघ्या 20 रुपयांच्या बचतीवर तुम्ही लाखोंनी कमवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्हाला बचतीची सवय होईल आणि काही वर्षानंतर चागले पैसेही मिळतील. जाणून घेऊयात काय आहे योजना.

मुंबई : कोरोनामुळे 2020 हे वर्ष अत्यंत वाईट गेलं. सरत्या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले (Financial Crisis Tips). अनेकांनी आपलं रोजगार गमावला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. याच काळात आपल्याला बचत आमि गुंतवणुकीचं महत्त्व कळालं. कारण, कधी कुठे आपल्याला पैशांची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यात जर पैसा कमावण्याचं साधनचं नष्ट झालं तर स्थिती आणखी बिकट होते, हे आपल्यापैकी अनेकांनी या काळात अनुभवलं असेल (Financial Crisis Tips).

त्यामुळे बचत आणि गुंतवणूक या गोष्टी अशावेळी आपल्याला आधार देतात. गेल्या वर्षाने आपल्याला जी शिकवण दिली ती आपल्याला आता येत्या वर्षात कामी येणार आहे. अशा परिस्थितीत कशाप्रकारे आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा कुठे वळवावा याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.

1. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत

तुम्ही फक्त तुमच्या नोकरीच्या भरवश्यावर राहू शकत नाही. गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं की अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे घरात एकपेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत असणं गरजेचं आहे. जर तुमची पत्नी किंवा घरातील इतर कुठली व्यक्ती तिच्या सुविधेनुसार नोकरी किंवा व्यवसाय करु इच्छितात तर त्यांचं स्वागत करा. घरात एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत ठेवा.

2. बचत करण्याची सवय टाका

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सिनेमाघर, शॉपिंग मॉल, पर्यटन स्थळं, बाजार वगैरे बंद असल्याने आपण घरी होतो. या गोष्टी बंद असल्याने आपला खूपसारा पैसा वाचला. यावरुन हे कळतं की आपण वायफळ खर्च कमी केले तर कितीतरी पैसे वाचू शकतात.

3. आरोग्य आणि आरोग्य विमा

वर्ष 2020 मध्ये सर्वांना आरोग्य विम्याचं महत्त्व कळालं. जेव्हा अचानक लोकांना उपचारासाठी पैशांची गरज वाटू लागली तेव्हा लोकांना आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो ते कळालं. महाग उपचार आणि रुग्णालयाच्या खर्चापासून वाचण्याचा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून आरोग्य विमा केला नसेल तर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आरोग्य विमा काढून घ्या.

4. बजेटकडेही लक्ष द्या

वाढती महागाईत खर्चांवर नियंत्रण ठेवणं कठीण असतं. पण, तुम्ही महिन्याभरातील मोठ्या खर्चावर नियंत्रण मिळवू शकता. मुलांची फीस, दूध, वर्तमानपत्र, रेशनचा खर्च या सर्वांवर लक्ष ठेवून आपण नियंत्रण मिळवू शकतो. याबाबत तुम्ही महिन्याभराचं बजेट तयार करु शकता. तसेच, दर दिवसाचा खर्च लिहूनही तुम्ही वायफळ खर्च वाचवू शकता.

5. गुंतवणूक करा

फक्त कर वाचवण्यासाठी नाही तर चांगल्या भविष्यासाठी आणि भविष्यातील गरजेसाठी तुम्ही तुमची बचत कुठेतरी गुंतवणे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफीसमधील योजनांपासून ते म्युचुअल फंड, पीपीएफ सारख्या पर्यायांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता (Financial Crisis Tips).

6. सरकारी योजनांचा लाभ घ्या

सरकारकडून अनेक योजना चालवण्यात येतात ज्या तुमच्या फायद्याच्या असतात. या योजनांमध्ये नोकरीसाठी प्रशिक्षित करण्यासाठी बांधकाम करणे, रेशन, एलपीजीसारख्या गरजांसाठी आर्थिक आधार मिळतो. तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार या योजनांची माहिती घेवून त्यासाठी अर्ज करु शकता. नोकरी गमावलेल्या लोकांना पंतप्रधान मुद्रा लोन घेवून स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकता.

7. आपत्कालीन निधी

प्रत्येक व्यक्तीकडे एक आपत्कालीन निधी असणं महत्त्वाचं आहे. मोठा आजार, लग्न, नोकरी किंवा इतर कुठल्या परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर तुमच्याजवळ आपत्कालीन निधी असणं महत्त्वाचं आहे. नोकरी गमावण्याच्या स्थितीत हे आपत्कालीन निधी तुमच्या कामात येऊ शकतात. त्यामुळे बचत करण्याची सवय लावा.

Financial Crisis Tips

संबंधित बातम्या :

फक्त 500 रुपये जमवून ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; 70 लाखांच्या नफ्यासह मिळणार 1 कोटी रुपये

PF चे पैसे आले! EPFO ने 8.50% व्याज केलं ट्रान्सफर, असा चेक करा तुमचा बॅलेंस

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; अन्यथा मोठा तोटा