Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय? 5 मार्च रोजी झाला का बदल

Petrol Diesel Price : रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किती फरक पडला? गेल्या काही महिन्यांपासून रोजच्या इंधन दरात 5 पैशे ते 1 रुपयांच्या आसपास फरक पडला आहे. काही राज्यांनी डिझेलवर कर वाढविल्याने त्या राज्यात इतर राज्यांपेक्षा डिझेल 3-5 रुपयांनी महागले आहे.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय? 5 मार्च रोजी झाला का बदल
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 8:40 AM

नवी दिल्ली : भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर (Petrol Diesel Price) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींचा (Crude Oil Price) परिणाम दिसतो. या किंमतींआधारेच इंधनाचे दर प्रत्येक दिवशी अपडेट होतात. रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किती फरक पडला? गेल्या काही महिन्यांपासून रोजच्या इंधन दरात 5 पैशे ते 1 रुपयांच्या आसपास फरक पडला आहे. काही राज्यांनी डिझेलवर कर वाढविल्याने त्या राज्यात इतर राज्यांपेक्षा डिझेल 3-5 रुपयांनी महागले आहे. राज्यातील प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही नाममात्र तफावत दिसून येते. तुमच्या शहरातील किंमती तुम्हाला घरबसल्या एका एसएमएसवर जाणून घेता येतात. तसेच इतर शहरातील भावही जाणून घेता येतात. सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यात फार मोठा बदल झालेला नाही.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 79.6 डॉलर प्रति बॅरल विक्री झाले. ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 1.27 टक्के वाढ झाल्याने एक बॅरलचा भाव 85.83 डॉलर झाला. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

फेब्रुवारीत रशियाचे इंधन तेलाची आयात घसरली. एका महिन्यात प्रत्येक दिवशी केवळ 123,000 बॅरल तेल आयात करण्यात आले. गेल्या महिन्यात जानेवारीच्या तुलनेत 28 टक्के कमी कच्चे तेल आयात करण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये भारताने रशियाकडून जानेवारीच्या तुलनेत कमी कच्चे तेल आयात केले. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची आयात केली होती. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधन दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.07 तर डिझेल 92.62 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.96 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.41रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.38 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर आहे

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.