VIDEO: मोदी सरकारमधील ‘लेडी ब्रिगेड’ची चाय पे चर्चा

VIDEO: मोदी सरकारमधील 'लेडी ब्रिगेड'ची चाय पे चर्चा
मोदी सरकारमधील 'लेडी ब्रिगेड'ची चाय पे चर्चा

Modi Cabinet | या कार्यक्रमात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आणि अर्थखात्याच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री भारती पवार यादेखील सहभागी झाल्या होत्या. निर्मला सीतारामन यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 12, 2021 | 10:18 AM

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दिल्लीतील आणखी एका घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत दिल्लीत नुकतीच मोदी सरकारमधील ‘लेडी ब्रिगेड’ची चाय पे चर्चा संपन्न झाली. या अनौपचारिक चर्चासत्रात केंद्रीय मंत्रिपरिषदेतील 11 महिला नेत्यांचा समावेश होता. यावेळी निर्मला सीतारामन आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी सर्व महिला मंत्र्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आणि अर्थखात्याच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री भारती पवार यादेखील सहभागी झाल्या होत्या. निर्मला सीतारामन यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्मृती इराणी, ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि राज्यमंत्री रेणुका सिंह सरुता यादेखील हजर होत्या.

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Reshuffle : दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, कसा आहे राजकीय प्रवास?

भारती पवार म्हणाल्या, फडणवीसांचे आभार मानते आणि प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना हसू आवरेना, तो व्हीडीओ पुन्हा व्हायरल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें