एफएमसीजी कंपन्यांना युद्धाचा फटका; महागाई उच्चस्थरावर, विक्रीचे प्रमाण घटले

एफएमसीजी कंपन्यांना युद्धाचा फटका; महागाई उच्चस्थरावर, विक्रीचे प्रमाण घटले

अमेरिका (America)-युरोपमध्ये रेकॉर्ड ब्रेक महागाई (Inflation) वाढत आहे, त्या तुलनेत भारतातील महागाई नियंत्रणात आहे. अशा बातम्याही तुम्ही पाहत आणि ऐकत असालच. अमेरिका आणि युरोपमधील महागाई आणि आपल्याकडील किरकोळ महागाईची तुलना करून तुम्ही समाधान मानत असाल तर जागे व्हा.

अजय देशपांडे

|

Mar 28, 2022 | 5:40 AM

अमेरिका (America)-युरोपमध्ये रेकॉर्ड ब्रेक महागाई (Inflation) वाढत आहे, त्या तुलनेत भारतातील महागाई नियंत्रणात आहे. अशा बातम्याही तुम्ही पाहत आणि ऐकत असालच. अमेरिका आणि युरोपमधील महागाई आणि आपल्याकडील किरकोळ महागाईची तुलना करून तुम्ही समाधान मानत असाल तर जागे व्हा. गेल्या सहा महिन्यातील खरेदी केलेल्या किराणा मालाच्या पावत्या पाहा आणि हिशोब लावा साबण, बिस्किट, नमकीन, मॅगी, मंजन, कॉफी,चहापत्ती, खाद्यतेल (Edible oil), दूध, ब्रेड, कपडे धुण्याची पावडर महाग झालीये आणि या पुढेही या वस्तूंच्या किंमती वाढतच राहणार यात तीळमात्र शंका नाही. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलिव्हर म्हणजेच HUL गेल्या सहा महिन्यांपासून सतत वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ करत आहे. होळीच्या आनंदात नुकतीच करण्यात आलेली भाववाढ तुम्हाला लक्षात आली नसणार हे नक्की. एचयूएल नं साबण्याच्या किंमतीत 2 ते 17 टक्क्यानं वाढ केलीये. गेल्या सहा महिन्यात सर्वच वस्तूंच्या किंमती 25 ते 30 टक्क्यानी वाढल्यात. म्हणजेच किराणा मालाच्या यादीतील रिन, सर्फ, विम बार, ब्रू कॉफी, ताजमहल, लक्स, डवच्या किंमतीत मोठी वाढ झालीये.

आणखी महागाई वाढण्याची शक्यता

एचयूएल प्रमाणेच इतर कंपन्याही त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत वाढ करत आहेत. दोन मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगीही 2 रुपयांनी महाग झालीये. आता मॅगीची किंमत 12 रुपयांहून 14 रुपयांवर गेलीये. युद्धामुळे बाजारात खूप अस्थिर परिस्थिती आहे. वस्तूंच्या किंमतीत आणखी 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पारले कंपनीचे अधिकारी मयंक शाह यांनी दिलीये. कच्चा तेलाच्या किंमती 140 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्यात. तर पाम तेलाच्या किंमती 180 रुपये प्रति लिटरवर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत किमती सतत वाढत राहणार असल्याचंही शाह यांनी सांगितलंय.

वस्तूंची मागणी कमी होण्याची भीती

कोरोनानंतर आता कुठं व्यवसाय रुळावर येत असतानाच युद्धामुळे किंमती वाढत असल्यानं मागणी कमी होईल, अशीही भीतीही कंपन्यांना वाटतेय. महागाईमुळे चिंता वाढलीय. महागाईमुळे खर्च करताना ग्राहक आखडता हात घेत आहेत. मोठ्या वस्तू खरेदी करण्याऐवजी लहान पॅक खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलाय. महागाईमुळे वस्तूंच्या किंमती वाढू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं डाबर इंडियाचे मुख्य वित्त अधिकारी अंकुश जैन यांनी म्हटलंय. कच्चा मालात झालेली संपूर्ण दरवाढ कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत अद्याप पोहचू दिली नाही. त्याचा प्रत्यय महागाईच्या आकडेवारीमध्येही दिसून येतो. घाऊक महागाई 13 टक्क्यांच्या वर तर किरकोळ महागाई 6 टक्क्यांवर आहे. घाऊक महागाईला तुम्ही कंपन्यांची महागाई समजू शकता. म्हणजेच कंपन्यांना मिळणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत 13 टक्के वाढ झालीये. याचाच अर्थ कंपन्यांनी संपूर्ण महागाईची झळ अद्याप ग्राहकांपर्यंत पोहचू दिली नाही. मात्र जेव्हा ही महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचेल तेव्हा महागाईचा आणखीनच भडका उडेल.

संबंधित बातम्या

…तर पुढील आठ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार; निती आयोगाचा अंदाज

पुढील आठवडा शेअर मार्केटसाठी कसा राहणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भविष्यात घरांच्या किंमती आणखी वाढणार? गुढीपाडव्याचा मुहूर्त घर खरेदीसाठी चांगला, पण खिशाला परवडणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें