AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM विसरा, या ॲपच्या मदतीने काढा पैसा, फोनला हात लावताच पेमेंट होणार, UPI PIN ही टाकावा नाही लागणार

Paytm App Payment: आता पैसे काढण्यासाठी एटीएमकडे धाव घेण्याची गरज नाही. या ॲपच्या मदतीने पैसा काढता येणार आहे. यासाठी वारंवार पिन क्रमांक दाबण्याची आणि तो लक्षात ठेवण्याचीही गरज नाही. काय आहे हे नवीन फीचर? हे ॲप मोबाईलमध्ये असल्यास होईल फायदा

ATM विसरा, या ॲपच्या मदतीने काढा पैसा, फोनला हात लावताच पेमेंट होणार, UPI PIN ही टाकावा नाही लागणार
Paytm App PaymentImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 08, 2026 | 3:43 PM
Share

Paytm App Payment: Paytm ने एक मोठे अपडेट सादर केले आहे. युझर्सला UPI पेमेंट आणि रोख रक्कम काढणे अत्यंत सोपे होईल. कंपनीने ॲपला बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशन फीचरसोबत जोडले आहे. त्याच्या मदतीने युझर्स आता फेस अनलॉक फीचरचा वापर करत पेमेंट करू शकतील. आतापर्यंत UPI पेमेंटसाठी PIN टाकणे आवश्यक होते. पण नवीन फीचरमुळे युझर्सला त्यांचा युपीआय पिन लक्षात ठेवणे गरजेचे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Paytm कंपनीने कार्डलेस ATM विड्रॉल ही सुविधाही सुरु केली आहे. म्हणजे एटीएम कार्ड नसले तरी थेट एटीएम केंद्रावर जाऊन या ॲपच्या माध्यमातून सहज पैसे काढू शकतात.

आता फिंगरप्रिंट आणि फेसद्वारे UPI पेमेंट

पेटीएमने आपल्या ॲपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशनचे फीचर जोडले आहे. त्याआधारे युझर्स फिंगरप्रिंट वा फेस लॉकच्या मदतीने UPI पेमेंट करू शकतात. आता प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची गरज नाही. केवळ फोन अनलॉक करावा लागेल आणि पेमेंट होईल. बायोमॅट्रिक ऑथन्टिकेशन ही एक सुविधा नाही. तर त्यात सुरक्षा पण मिळेल. फिंगरप्रिंट आणि फेस डेटा हा युनिक असतो. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो.

विना कार्ड ATM मधून काढा पैसा

Paytm ने दुसरे सर्वात मोठे अपडेट दिले आहे. विना कार्ड आता एटीएमवर जाऊन पैसे काढता येतील. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम ॲपच्या मदतीने रोख रक्कम काढता येईल. ATM मशीनवर QR कोड स्कॅन करता येईल. विना ATM कार्ड रोख रक्कम काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वात अगोदर Paytm ॲपवर जाऊन रोख रक्कम काढण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर ATM वर QR कोड स्कॅन करा. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर एटीएम मशीनमधून रक्कम बाहेर येईल. हे अपडेट खास करून त्या युझर्ससाठी खास आहे जे एटीएम कार्ड नेहमी विसरतात आणि एटीएम केंद्रावर जातात.

विना ATM कार्ड Paytm च्या माध्यमातून असे काढा पैसे

विना कार्ड ATM मधून पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी सर्वात अगोदर पेटीएम हे ॲप उघडा. त्यानंतर “Cash Withdrawal” वा “ATM Withdrawal” हा पर्याय निवडा. तुम्हाला किती रक्कम काढायची. ती काढा. त्यानंतर ॲपवर एक QR कोड वा रिक्वेस्ट जनरेट करेल. आता ज्या ATM वर क्यूआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे, तिथे तुम्हाला या सुविधेचा वापर करता येईल आणि पैसै काढता येईल.

Follow Us
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा