Pan Card | एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे…

पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी मह्त्त्वाचे ओळखपत्र आहे. आपल्याकडे पॅनकार्डदेखील नसेल आणि आपण ते बनवू इच्छित असल्यास आता कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.

Pan Card | एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे...
अशात अनेक वेळा कार्डवरली फोटो योग्य नसल्यामुळे व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पॅन कार्डवरील फोटो बदलण्याची पद्धती घेऊन आलो आहे.

मुंबई : पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी मह्त्त्वाचे ओळखपत्र आहे. आपल्याकडे पॅनकार्डदेखील नसेल आणि आपण ते बनवू इच्छित असल्यास आता कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही समस्येशिवाय आपण घर बसल्या पॅन कार्ड तयार करू शकता. खास गोष्ट म्हणजे आपण पॅन कार्ड बनवण्यापासून ते डाऊनलोड करणे या सगळ्या प्रक्रिया 5 मिनिटांपेक्षाही कमी वेळात पूर्ण करू शकता (Free Digital Pan card application without any charges).

यासाठी, आपल्याला खाली दिलेल्या काही टिप्स आणि स्टेप्सचे अनुसरण करावे लागेल. त्यानंतर आपण आपल्या फोनवरून स्वतःचे पॅन कार्ड बनवू शकाल. पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय आहे, ते जाणून घ्या…

पॅन कार्ड बनवण्याच्या स्टेप्स :

– सर्व प्रथम, आपल्याला अधिकृत आयकर https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/ वर जावे लागेल, जेथे आपण नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. ही एक ई-फायलिंग वेबसाईट आहे. जिथून आपल्याला पॅन कार्ड मिळू शकते आणि ते डाऊनलोड देखील होऊ शकते.

– जर आपले आधार कार्ड आपल्या फोन नंबरशी लिंक असेल, तरच ऑनलाइन पॅन कार्ड तयार केले जाऊ शकते. जर आपले आधार कार्ड, आपल्या मोबाईल नंबरशी जोडलेला नसेल, तर आपण या प्रक्रियेद्वारे आपले पॅन कार्ड बनवू शकत नाही. यासाठी प्रथम आपण आपला आधार कार्ड आपल्या फोन नंबरशी लिंक करावा लागेल. फक्त पॅन कार्डच नाही, बर्‍याच ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवरून ओटीपी आवश्यक आहे, अशा परिस्थितीत आधार व फोन लिंक असणे आवश्यक आहे.

– पॅन कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर, तेथे आपणास ‘गेट न्यू पॅन’चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये, तुम्हाला प्रथम आधार कार्ड नंबर विचारला जाईल आणि नंबर भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या बॉक्समध्ये कॅप्चा कोड भरावा लागेल. हे भरल्यानंतर आपल्याला खाली जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्या आधार कार्डवरून लिंक नंबरवर एक ओटीपी येईल आणि त्यानंतर एक नवे पेज उघडेल. यात ओटीपी भरा आणि पुढे प्रक्रिया सुरू ठेवा (Free Digital Pan card application without any charges).

– पुढे आधार कार्ड ओटीपी भरुन ‘ओके’वर क्लिक करताच, ते आपोआप स्क्रीनवर आपली माहिती दर्शवेल. ज्यात आपले नाव, जन्म तारीख, लिंग, फोटो, पत्ता सर्व लिहिलेले असेल. आता आपल्याला स्वतःहून काही तपशील भरायचा नाही. केवळ भरलेला मजकूर पडताळून पाहणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला पॅन रिक्वेस्ट नंबर मिळेल.

कसे डाऊनलोड कराल ‘पॅन कार्ड’?

आपणास आपले पॅनकार्ड डाऊनलोड करायचे असल्यास, काही काळानंतर आपल्याला वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर पुन्हा जावे लागेल. जिथून आपण नवीन पॅन कार्ड तयार करण्याचा पर्याय निवडला होता, तिथे आता आपल्याला ‘चेक स्टेट्स’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्हाला आधार कोड आणि कॅप्चा कोडे भरावा लागेल आणि ओटीपीची विनंती करावी लागेल. यानंतर ओटीपी भरावा लागेल. यानंतर आपण पॅन कार्ड डाऊनलोडवर क्लिक करा. क्लिक करताच हे पॅन कार्ड डाऊनलोड केले जाईल.

पॅन कार्ड उघडण्यासाठी पासवर्डची गरज!

यानंतर, आपल्या पॅन कार्डची पीडीएफ फाइल डाऊनलोड होईल, जी उघडण्यासाठी आपल्याला पासवर्डची आवश्यक असेल. हा पासवर्ड आपली जन्मतारीख असून, तो DD / MM / YYYY स्वरूपात भरावा लागेल. जर, आपली जन्मतारीख 1 जानेवारी 2000 असेल, तर हा पासवर्ड असेल, 01012000. हे लिहून आपण आपले पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता. त्यात आपल्याला पॅन कार्ड दिसेल आणि आपण ते प्रिंट करू शकता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. आपल्याला प्लास्टिक कार्ड हवे असल्यास आपण त्यासाठी अर्ज करू शकता, त्यासाठी आपल्याला शुल्क भरावे लागेल.

(Free Digital Pan card application without any charges)

हेही वाचा :

Published On - 10:38 am, Mon, 21 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI