सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त

देशातील 100 टक्के लोकांना स्वच्छ इंधन पोहोचवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:06 AM, 1 Mar 2021
सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त

नवी दिल्ली : येत्या दोन वर्षात एक कोटीहून अधिक मोफत एलपीजी कनेक्शन (Free LPG Connection) देण्याची आणि लोकांना एलपीजी सहज मिळावा यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. देशातील 100 टक्के लोकांना स्वच्छ इंधन पोहोचवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे. (free lpg connections to 1 crore petrol diesel and cooking gas may cheaper soon)

पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, कमी कागदपत्रं आणि स्थानिक रहिवासी पुरावा नसल्यासही कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. इतकंच नाहीतर, ग्राहकांना तीन डीलर्सकडून पुन्हा एक रिफिल सिलिंडर मिळण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त चार वर्षात गरीब महिलांच्या घरात आठ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आणि यामुळे एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या देशात 29 कोटींवर पोहचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान उज्ज्वला (PMUY) योजनेंतर्गत एक कोटीहून अधिक एलपीजी कनेक्शन देण्याची योजना जाहीर करण्यात आली.

सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन वर्षात अतिरिक्त एक कोटी कनेक्शन देण्याचं लक्ष्य ठेवण्याची आमची योजना आहे.’ साधारणपणे इंधन अनुदानाचं वाटप प्रति कनेक्शन 1,600 रुपये खर्च करण्यासाठी पुरेसे असावे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि एपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमती सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे, तर विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG Gas Cylinder) किंमती मार्च किंवा एप्रिलमध्ये कमी होऊ शकतात. प्रधान म्हणाले की, तेल उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे, जेणेकरुन भारतातील सामान्य जनतेला तेलाच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोलियम पदार्थ देशात महाग होत आहेत. त्यांच्या देशाच्या हितासाठी अधिक नफा मिळविण्यासाठी, कच्च्या तेलाचा पुरवठा करणारे देश कच्च्या तेलाच्या किंमती वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबद्दल धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, हिवाळ्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत, हिवाळ्यात असे होते. आता हिवाळा संपला आहे, मग किंमती कमी होतील.

उत्पादन वाढल्यावर किंमती कमी होणार

कोरोनामुळे होणारा खप कमी झाल्यामुळे तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी केले होते. पण आता परिस्थिती सामान्य झाली आहे. तेलाची मागणी वाढली आहे, तरीदेखील उत्पादन वाढवण्यात आलेले नाही. त्यामुळे एलपीजीचा वापर वाढला आणि उत्पादनाअभावी किंमती वाढल्या. तथापि, आता मार्चच्या उत्तरार्धात आणि एप्रिलच्या सुरूवातीला एलपीजीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारत हा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे भारताने रशिया, कतार आणि कुवैत सारख्या तेल उत्पादक देशांवर तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी दबाव आणला आहे. जेव्हा तेलाचे उत्पादन वाढेल तेव्हा प्रति बॅरलची किंमत कमी होईल आणि नंतर किरकोळ तेलाची किंमतही कमी होईल.

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरातील ऐतिहासिक विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. तेलाच्या किंमती 16 पटीने वाढल्या आहेत. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. रविवारी तेलाचे दर मात्र स्थिर राहिले. (free lpg connections to 1 crore petrol diesel and cooking gas may cheaper soon)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव

सरकारचा लाखो व्यावसायिकांना मोठा दिलासा, ‘ही’ आहे वार्षिक GST रिटर्न भरण्याची नवी मुदत

(free lpg connections to 1 crore petrol diesel and cooking gas may cheaper soon)