Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव

गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. आज (सोमवारी) दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 6:37 AM

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) आकाशाला भिडत आहेत. या किंमतींमध्ये सातत्याने वाढत होत आहेत. देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. आज (सोमवारी) दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (petrol diesel rate today 01 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दराइतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचे दर 91.17 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर वाढून 81.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर मुंबईतील पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढून प्रतिलिटर 97.57 रुपये झाली आहे. तर डिझेलचे दर वाढून 88.60 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel rate today 01 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

संबंधित बातम्या – 

सरकारचा लाखो व्यावसायिकांना मोठा दिलासा, ‘ही’ आहे वार्षिक GST रिटर्न भरण्याची नवी मुदत

आपण पेन्शन फंडामध्ये गुंतवणूक करता?, मग वॉरेन बफे यांचा आपल्यासाठी खास संदेश

क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अडचणीत आणू शकतात बँकेच्या या ऑफर्स

(petrol diesel rate today 01 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.