क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अडचणीत आणू शकतात बँकेच्या या ऑफर्स

क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अडचणीत आणू शकतात बँकेच्या या ऑफर्स (Remember these things before raising the credit card limit)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:59 PM, 28 Feb 2021
क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अडचणीत आणू शकतात बँकेच्या या ऑफर्स
क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली : क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या बँका सुरुवातीला आपल्या ग्राहकांना कमी क्रेडिट लिमिटचे कार्ड देतात. नंतर ग्राहकाची ट्रान्झेक्शन हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर ते मर्यादा वाढवतात किंवा ते वाढवण्याची ऑफर देतात. क्रेडिट लिमिट वाढवण्याआधी बँका ग्राहकांच्या क्रेडिट व्यवहार आणि उत्पन्नातील वाढ जाणून घेतात. आपण क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर केल्यास आणि वेळेवर बिल भरल्यास मर्यादा वाढविण्यासाठी बँकांकडून चांगली ऑफर मिळते. परंतु हे जाणून घेणे महत्वाचे आहे की क्रेडिट लिमिट वाढविणे हे केवळ फायदेशीर नाही तर नुकसानदायीही ठरु शकते. (Remember these things before raising the credit card limit)

क्रेडिट लिमिट वाढविणे सोयीचे असून, कार्डद्वारे खरेदीचे पर्याय वाढवतात, असे वाटत असले तरी त्याचा विपरीत परिणाम देखील होतो. क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा मोठा धोका म्हणजे कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका. मर्यादा जितकी जास्त असेल तितका खर्च जास्त होईल आणि यामुळे अनावश्यक दबाव वाढेल. म्हणूनच, तज्ञांचे म्हणणे आहे की कमी मर्यादा म्हणजे कमी खर्च आणि क्रेडिट परतफेड करण्याची डोकेदुखीही कमी. एकंदरीत याचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. तथापि, काही लोकांसाठी, अधिक क्रेडिट लिमिट फायदेशीर ठरते.

क्रेडिट मर्यादा वाढवण्याचे फायदे

क्रेडिट स्कोअर कॅल्क्युलेट करताना क्रेडिट युटीलायझेशन रेश्यो (सीयूआर) पाहिले जाते. कार्ड धारक क्रेडिट मर्यादेचा किती वापर करतो हे सीयूआर दाखवते. जर सीयूआर 30% पेक्षा जास्त असेल तर ते क्रेडिटच्या बाबतीत चांगले मानले जात नाही. ही टक्केवारी वाढवल्यास डिफॉल्टची शक्यता वाढते. जेव्हा सीयूआरची स्कोअर 30 टक्क्यांनी वाढते तेव्हा क्रेडिट ब्युरो क्रेडिट स्कोअर कमी करते ज्यामुळे पुढे लिमिट वाढविणे कठीण होते. अशा परिस्थितीत, जर आपला सिबिल स्कोअर आणि रिपेमेंट हिस्ट्री चांगली असेल तरच केवळ तुमची क्रेडिट मर्यादा वाढविली जाईल.

अडचणीच्या काळात प्रभावी

क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्याचा फायदा म्हणजे तो कठिण परिस्थितीत खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतो. आजारपण किंवा अपघात याबद्दल कोणालाही आधीच माहिती नाही. दुर्दैवाने, जर अशी घटना घडली आणि आपल्याकडे पैसे नसतील तर आपण क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून आपत्ती टाळू शकतो. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की बिले योग्य तारखेला जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा नंतर अडचण होऊ शकते. तसेच अधिक व्याज दराच्या जाळ्यात अडकू शकता.

अधिक कर्ज मिळते

जर क्रेडिट कार्डची मर्यादा जास्त असेल तर जास्त कर्ज घेण्याची सोय आहे. बँकेकडून तुम्हाला बर्‍याच ऑफरही दिल्या जातात. पण ही सुविधा सर्वांना मिळत नाही. ज्या ग्राहकांनी वेळेवर बिले दिली आहेत अशाच ग्राहकांना बँका ऑफर देतात. योग्य वेळी बिल भरल्यामुळे बँक ग्राहकावर विश्वास ठेवते आणि अधिक कर्जाच्या रूपात त्याचा फायदा होऊ शकतो. पत मर्यादा वाढविण्यापूर्वी, परतफेड योग्य वेळी केली आहे याची खात्री करा. अन्यथा मर्यादा वाढवण्याचा मोठा फायदा होणार नाही.

क्रेडिट मर्यादा वाढविण्याचे तोटे

क्रेडिट कार्डसह खर्च करताना अपण विचार करतो की, एक महिन्यानंतर बिल भरायचे आहे. यामुळे आपण जास्त खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाही आणि बर्‍याचदा अनावश्यक खर्चही केला जातो. कधीकधी हा खर्च इतका असतो की परतफेड करताना अडचण येते. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्रेडिट मर्यादा कमी ठेवणे जेणेकरून कर्जाचा बोजा वाढणार नाही.

बरेच एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड घेतात

बरेच लोक क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड घेतात. यामुळे क्रेडिट कार्डवरील अवलंबन वाढते. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढू लागतो. या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कर्ज देखील घ्यावे लागते. ज्यामुळे ग्राहकाला दुप्पट फटका बसतो. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विचारपूर्वक क्रेडिट मर्यादा वाढविणे. जर आपण दरमहा संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरले तर कोणतीही अडचण नाही परंतु जर थकबाकी कायम राहिली तर त्यावर व्याज वाढेल. कमी क्रेडिट मर्यादा असण्याचा फायदा हा आहे की, थकबाकी कमी असेल आणि व्याज देखील कमी द्यावे लागेल. जर क्रेडिट कार्डाची मर्यादा जास्त असेल आणि जर ते हरवले तर कमी मर्यादा असलेल्या कार्डाच्या तुलनेत त्याचे नुकसान अधिक होईल. (Remember these things before raising the credit card limit)

इतर बातम्या

कोरोनाच्या भीतीमुळे SBI सह अनेक बँका देणार घर बसल्या सुविधा, असा ‘घ्या’ फायदा

डबल होईल पैसा! 3 महिन्यात पाचपट कमवाल असा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय