कोरोनाच्या भीतीमुळे SBI सह अनेक बँका देणार घर बसल्या सुविधा, असा ‘घ्या’ फायदा

या नंबरवर कॉल करून तुम्ही घरातूनच बँकिंग सुविधा घेऊ शकता. दाराजवळच बँकिंग सेवा सुरू झाल्यावर बँकेत जाऊन तिथे लांब रांगा लावण्याची गरज नाही.

कोरोनाच्या भीतीमुळे SBI सह अनेक बँका देणार घर बसल्या सुविधा, असा 'घ्या' फायदा
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:43 PM

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्यासह देशातील सर्व सरकारी बँका घरी बँकिंग सेवा (Banking Services) उपलब्ध करुन देत आहेत. बँकांनी डोर स्टेप बँकिंगसाठी (Door Step Banking) टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या नंबरवर कॉल करून तुम्ही घरातूनच बँकिंग सुविधा घेऊ शकता. दाराजवळच बँकिंग सेवा सुरू झाल्यावर बँकेत जाऊन तिथे लांब रांगा लावण्याची गरज नाही. डोरस्टेप बँकिंगमध्ये बँका पैसे काढणे आणि जमा करणे यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. (sbi door step banking dsp services get money at your home cash withdrawal)

बँकांच्या डोर स्टेप सेवेसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत नोंदणी करावी लागणार आहेत. तुम्ही बँकेच्या ई-सुविधा, ग्राहक कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे थेट बँकिंग सेवा घेऊ शकता. डोर स्टेप सेवा देण्यासाठी बँकांनी बँकिंग एजंट्सची नेमणूकही केली आहे.

डोर स्टेप बँकिंग सेवेसाठी मिळणार ‘या’ सुविधा

– चेक/ड्राफ्ट/पे ऑर्डर (पिक-अप)

– नवीन चेक बुकसाठी मागणी स्लिप (पिक-अप)

– IT/GST चालान स्वीकृति (पिक-अप)

– फॉर्म 15G आणि 15H (पिक-अप)

– जारी केलेल्या सूचनांनुसार (पिक-अप)

– खाता विवरणी (डिलिव्हरी)

– फिक्स्ड डिपॉझिट पावत्या (डिलिव्हरी)

– TDS/फॉर्म 16 प्रमाणपत्र (डिलिव्हरी)

– ड्राफ्ट/पे-ऑर्डर (डिलिव्हरी)

– गिफ्ट कार्ड (डिलिव्हरी)

– तसेच, रोख पैसे काढण्याची सेवा (डेबिट कार्ड / एईपीएस)

– जीवन प्रमाणपत्र

स्टेट बँकेची Door Step Banking सेवा

एसबीआयच्या Door Step Banking या सेवेची माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. यासेवेसाठी निकष लावण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक आहे, जे बँकेत जाऊ शकत नाहीत ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय केवायसी जमा करावे लागणाऱ्या ग्राहकांना देखील याचा लाभ होणार आहे. मात्र, ग्राहकांच्या बँक खात्याशी त्यांच्या मोबाईल नंबर लिंक करावे लागणार आहेत. संयुक्त खाते, मायनर खाते, व्यावसायिक खातं यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. स्टेट बँकेची शाखा असेल तिथून 5 किलोमीटर परिसरात त्या ग्राहकानं राहायला असलं पाहिजे.

या योजनेचा लाभ कसा घेणार?

Door Step Banking या योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करुन त्याय योजनेचा लाभ घेता येईल. स्टेट बँकेची वेबसाईट www.psbdsb.in वर देखील सेवेसाठी नोंदणी करताय येणार आहे. (sbi door step banking dsp services get money at your home cash withdrawal)

संबंधित बातम्या – 

डबल होईल पैसा! 3 महिन्यात पाचपट कमवाल असा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

11 लाख लोकांच्या नोकऱ्या धोक्यात, Future-Reliance deal मुळे संकट

1 मार्चपासून तुमचं आर्थिक गणित बदलणार, गॅस सिलेंडर ते बँकेच्या कामात होणार मोठे बदल

प्लॅटिनम कार्ड, दोन लाखाचा विमा आणि बरंच काही, Bank of Baroda ची महिलांसाठी खास योजना

(sbi door step banking dsp services get money at your home cash withdrawal)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.