11 लाख लोकांच्या नोकऱ्या धोक्यात, Future-Reliance deal मुळे संकट

अधिक माहितीनुसार, फ्यूचर ग्रुप आणि फ्यूचर रिटेल-रिलायन्स (Future Retail-Reliance) यांच्यात होणाऱ्या कराराला रोखण्यासाठी अॅमेझॉन (Amazon) यशस्वी झालं तर यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे.

11 लाख लोकांच्या नोकऱ्या धोक्यात, Future-Reliance deal मुळे संकट
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 2:03 PM

नवी दिल्ली : भविष्यात 11 लाख लोकांच्या नोकरी जाण्याचा धोका समोर आहे. अधिक माहितीनुसार, फ्यूचर ग्रुप आणि फ्यूचर रिटेल-रिलायन्स (Future Retail-Reliance) यांच्यात होणाऱ्या कराराला रोखण्यासाठी अॅमेझॉन (Amazon) यशस्वी झालं तर यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. (around 11 lakh people will lose jobs if future reliance deal falls)

फ्यूचर समूहाने आणि रिलायन्सने या कराराद्वारे हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे Big Bazaar, EasyDay, Nilgiris, Central, Brand Factory असे अनेक व्यवसाय सुरू आहेत ज्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या जाता कामा नये. यामुळे मोठे व्यवहार ठप्प होऊ शकतात.

हा करार न झाल्यास, देशभरातील 450 शहरांमध्ये असलेली फ्यूचर ग्रुपची 2000 स्टोअर बंद होतील आणि जवळपास 1.1 दशलक्ष लोकांना बेरोजगार मिळेल, तर सुमारे 6000 विक्रेते आणि पुरवठादार त्यांचे सर्वात मोठे ग्राहक गमावतील.

फ्युचर ग्रुपने ऑगस्ट महिन्यात रिटेल, होलसेल व आणखी काही बिझनेस 24,713 कोटी रुपये एवढ्या किंमतीत रिलायन्स इंडस्ट्रीला विकले. दिल्ली उच्च न्यायालयानेही अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र खंडपीठाने आधीचा निर्णय रद्द करीत अमेझॉनला झटका दिला. त्यामुळे अमेझॉनने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

खंडपीठाने अमेझॉनलाही नोटीस बजावत 26 फेब्रुवारीपर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होतं. सिंगापूरच्या आर्बिट्रेशन न्यायालयानेही ऑक्टोबर महिन्यात अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता. आर्बिट्रेशन न्यायालयाने फ्युचर ग्रुपला कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण किंवा विक्रीस तसेच निधी उभारण्यासाठी शेअर्स जारी करण्यावर बंदी घातली होती.

अ‍ॅमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर कूपनमध्ये 49 टक्के भागिदारीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. यावेळी केलेल्या करारामध्ये फ्यूचरला दुस-या कोणत्याही कंपनीसोबत करार करण्यापूर्वी अ‍ॅमेझॉनला माहिती देणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. परंतु, फ्यूचरने कोणतीही कल्पना न देता करार केल्याचे अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे. (around 11 lakh people will lose jobs if future reliance deal falls)

संबंधित बातम्या – 

1 मार्चपासून तुमचं आर्थिक गणित बदलणार, गॅस सिलेंडर ते बँकेच्या कामात होणार मोठे बदल

प्लॅटिनम कार्ड, दोन लाखाचा विमा आणि बरंच काही, Bank of Baroda ची महिलांसाठी खास योजना

प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?

(around 11 lakh people will lose jobs if future reliance deal falls)

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.