AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईच्या लाटेचा इशारा, इंधन दरवाढीचा फटका, जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज

वाढत्या इंधन दरांचा परिणाम देशभरातील महागाईवरही होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या दहा दिवसांत चौपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे.

महागाईच्या लाटेचा इशारा, इंधन दरवाढीचा फटका, जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज
जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2026 | 9:11 AM
Share

इंधनाच्या किमतीत चौथ्यांदा झालेली वाढ आणि सोनं-चांदीवरील आयात शुल्कात वाढविल्याने येत्या जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांवर जाईल. दोन वर्षांत पहिल्यांदाच हा दर इतका वाढण्याचा अंदाज आहे. तर रिझर्व्ह बँकसुद्धा व्याजदरात वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. देशभरात 15 मे पासून अकरा दिवसांत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 7.38 रुपये, तर डिझेलच्या दरात 7.48 रुपये वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम वाहतून आणि साठवणूक क्षेत्रावर गंभीरपणे जाणवणार आहे. त्याचबरोबर सरकारने 13 मे रोजी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून 15 टक्के केलं आहे. याचाही परिणाम महागाईवर होईल.

व्याजदर वाढण्याची शक्यता

बार्कलेज इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आस्था गुडवानी म्हणाल्या की, रिझर्व्ह बँकेकडून जूनमधील पतधोरणात व्याजदरात बदल केले जाणार नाहीत. सध्याची अस्थिर परिस्थिती आणि इंधन दरवाढीचा वाहतूक, प्रवास भाडं आणि कच्च्या मालाच्या किमतीवर होणारा परिणाम यामुळे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत महागाईत मोठी वाढ होईल. महागाई आटोक्याबाहेर गेल्यास व्याजदर वाढ करणं अपरिहार्य ठरेल.

RBI ची भूमिका

अर्थतज्ज्ञांच्या मते सध्याची महागाई प्रामुख्याने पुरवठा आणि इंधनाच्या खर्चाशी निगडीत आहे. त्यामुळे फक्त रेपो रेट वाढवल्याने महागाईवर तात्काळ लक्षणीय परिणाम होणार नाहीय. इंधन दरवाढीचा बाजारपेठेवर आणि ग्राहकांवर काय परिणाम होतो, हे आरबीआयला आधी पहायचं आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही देखील भारतासाठी चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर ‘ईवाय इंडिया’चे मुख्य धोरण सल्लागार डी. के. श्रीवास्तव म्हणाले की, पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत प्रति लिटर सरासरी 7.5 रुपये वाढ झाल्यास किरकोळ महागाईत पाऊण टक्का वाढ होईल. मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4 ते 4.5 टक्के राहील. तर जून महिन्यात तो 4.5 ते 5 टक्क्यांवर जाईल.

इंधन दरवाढीमुळे होणारा परिणाम स्थिरावण्याची प्रतीक्षा रिझर्व्ह बँक करेल आणि त्यानंतरच्या तिमाहीत व्याजदर वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांच्या पुढे गेल्यास रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढ सुरू होईल, असंही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं. मे महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी 12 जूनला जाहीर होणं अपेक्षित आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ