Petrol Diesel Rate Today : या शहरात पुन्हा घसरली पेट्रोल-डिझेलची किंमत, भाव एका क्लिकवर

Petrol Diesel Rate Today : या शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. एका एसएमएसवर हे भाव तुम्हाला जाणून घेता येतील.

Petrol Diesel Rate Today : या शहरात पुन्हा घसरली पेट्रोल-डिझेलची किंमत, भाव एका क्लिकवर
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 8:43 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तराच्या आसपास खेळत आहे. डॉलर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचा हा परिणाम आहे. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. आज 6 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 76.54 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 71.94 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले. जून 2017 पूर्वी इंधनाच्या किंमती दर 15 दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Rate Today) जाहीर होतो. एका एसएमएसवर तुमच्या शहरातील इंधनाचे भाव तुम्हाला जाणून घेता येतील.

असा झाला रेकॉर्ड गेल्या वर्षी 2022 च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात युक्रेनवर रशियाने हल्ला चढविला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. त्याचा थेट परिणाम सर्वच देशांवर दिसून आला. श्रीलंकेसह अनेक छोट्या अर्थव्यवस्था भरडल्या गेल्या. या देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. भारतात तर पेट्रोल 120 लिटरच्या घरात पोहचले. डिझेलमध्ये रेकॉर्डब्रेक उसळी घेतली.

भाव नाही झाले कमी केंद्र सरकारने गेल्यावर्षी 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. एक वर्ष उलटूनही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

अशी भरते सरकारची तिजोरी एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 2 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 107.16 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.38 आणि डिझेल 92.90 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.91 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.27 तर डिझेल 93.76 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.61 तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.64 तर डिझेल 95.08 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.76 तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.59 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.77 आणि डिझेल 92.28 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.82 रुपये तर डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.