AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani Hindenburg : दाल में कुछ काला है! कमाईची खेळी उघड, काय आहे ED चा खुलासा

Gautam Adani Hindenburg : 12 शॉर्ट सेलरमुळे अदानी समूहाला झटका बसू शकतो. प्रकरणात सध्या सर्वोच्च सुनावणी सुरु आहे. यातील दोन फर्म या भारतीय आहेत. त्यातील एक कंपनी दिल्लीत नोंदणीकृत आहे. गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणात सेबीने तिला दणका दिला आहे. तर दुसऱ्या ब्रोकर संस्थेची मुंबईत नोंदणी झाली आहे.

Gautam Adani Hindenburg : दाल में कुछ काला है! कमाईची खेळी उघड, काय आहे ED चा खुलासा
| Updated on: Aug 30, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : हिंडनबर्ग रिपोर्टने (Hindenburg Report) यावर्षीच्या सुरुवातीलाच भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात मोठे वादळ आणले. या वादळाने भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका दिला. जागतीक श्रीमंतांच्या यादीत टॉप-3 मध्ये असलेले अदानी या झटक्याने झरझर खाली घसरले. अदानी समूहात मोठी उलथापालथ झाली. शेअर बाजाराला त्याचे हादरे बसले. गुंतवणूकदारांनी झटपट शेअर विक्री केले. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हिंडनबर्ग रिपोर्टवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. त्यात 12 शॉर्ट सेलर फर्मने शॉर्ट सेलिंगच्या (Short Selling) माध्यमातून सर्वाधिक नफा कमाविल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. या ब्रोकर फर्ममधील दोन भारतीय आहे. एक दिल्लीत नोंदणीकृत ब्रोकर आहे, त्याला यापूर्वीच गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणात बाजार नियंत्रक सेबीने (SEBI) दणका दिला होता. तर दुसरी संस्था मुंबईतील आहे. तर इतर फर्म या परदेशातील आहेत.

टॅक्स हेवनमधील या कंपन्यांचा फायदा

या मलाई लाटणाऱ्या कंपन्या टॅक्स हेवनमधील आहेत. म्हणजे अशा देशातील आहे. जिथे कर सवलतीचा पाऊस आहे. उत्पन्नावर जास्त कर भरावा लागत नाही, असा देशातील आहे. या कंपन्या अशा देशात काम करतात, जिथे व्यापारावर गुंतवणूकदार, कंपन्या अथवा परदेशी गुंतवणूकदारांना जास्त कर भरावा लागत नाही. शुन्य कर लावण्यात येतो.

असा रंगला की डाव

कर सवलतीसाठी स्वर्ग असणाऱ्या देशांमधील या शॉर्ट सेलिंग कंपन्यांनीच मलिदा लाटला असा भाग नाही, तर त्यांच्या माध्यमातून परदेशातील मोठ्या माशांनी पण मोठी कमाई केली. यामध्ये परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPI) आणि काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FII) यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई करुन परदेशातील मोठ्या खेळाडूंना थेट फायदा पोहचवला.

कुठल्या आहेत या फर्म

या 12 मलाईदार संस्थापैकी दोन भारतीय आहेत. तर एक भारतीय परदेशी संस्था आहे. चार फर्म या मॉरिशसमधील आहेत. तर फ्रान्स, हाँगकाँग, कॅमन आईसलँड, आयर्लंड आणि लंडन येथील प्रत्येकी एक संस्था आहे. यातील परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPI) आणि काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FII) यांनी आयकर खात्याला मालकीचे कोणतेही विवरण, खुलासा आयकर खात्याकडे केलेला नाही.

काय आहे शॉर्ट सेलिंग

शॉर्ट सेलिंग ही एक टर्म आहे. त्यातून काही जण भरपूर कमाई करतात. गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक यासाठी करतो की त्याला फायदा व्हावा. तो एखाद्या शेअरमध्ये पैसे गुंतवतो आणि शेअरची किंमत वाढली की तो विकतो. त्यातून त्याला फायदा होतो. तर शॉर्ट सेलिंग त्याच्याविरुद्ध आहे. कंपनीचे शेअर घसरले तर त्यामाध्यमातून शॉर्ट सेलिंग करुन मोठा फायदा मिळतो.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत