GPF Interest Rate | केंद्र सरकारकडून General Provident Fund चे व्याजदर जाहीर, किती टक्के व्याज मिळणार?

केंद्र सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधीचे (General Provident Fund) व्याज दर जाहीर केले आहेत.

GPF Interest Rate | केंद्र सरकारकडून General Provident Fund चे व्याजदर जाहीर, किती टक्के व्याज मिळणार?
7th Pay Commission

मुंबई : केंद्र सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधीचे (General Provident Fund) व्याज दर जाहीर केले आहेत. या तिमाहीच्या व्याज दरामध्येही बदल झालेला नाही. केंद्र सरकारकडून लवकरच व्याजाची रक्कमही कोट्यावधी खातेदारांच्या खात्यावर पाठवली जाऊ शकते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतही सामान्य भविष्य निर्वाह निधीवर 7.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे. कमी व्याजदराच्या या युगात जीपीएफ व्याजदरामध्ये कोणतीही कपात करणे, ही कोट्यवधी खातेदारांसाठी चांगली बातमी मानली जात आहे. (General provident fund interest rates for July 2021 Remains Unchanged)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा सामान्य भविष्य निर्वाह निधीवर उपलब्ध आहेत. सलग सहाव्या तिमाहीत केंद्र सरकारने जीपीएफच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर चालू तिमाहीच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनच्या तिमाहीतही जीपीएफचा व्याज दर फक्त 7.1 टक्के आहे. हे व्याजदर एप्रिल 2020 मध्ये अखेरचे बदलण्यात आले होते. त्या काळात केंद्र सरकारने जीपीएफचे व्याज दर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर आणला होता.

‘या’ योजनांवरील व्याजदर 7.1 टक्के राहणार

  1. सामान्य भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा)
  2. अंशदायी भविष्य निर्वाह निधी
  3. अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी
  4. राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी
  5. इंडिया नेव्हल डॉकयार्ड कामगार भविष्य निर्वाह निधी
  6. संरक्षण सेवा अधिकारी भविष्य निर्वाह निधी
  7. सशस्त्र बल वैयक्तिक भविष्य निर्वाह निधी
  8. सामान्य भविष्य निर्वाह निधी (संरक्षण सेवा)
  9. भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी
  10. इंडिया ऑर्डनन्स फॅक्टरीज कामगार भविष्य निर्वाह निधी

जनरल प्रोव्हिडेंट फंड म्हणजे काय?

जनरल प्रोव्हिडेंट फंड हा एक भविष्य निर्वाह निधी आहे. पण त्याची सुविधा केवळ विशिष्ट प्रकारच्या कर्मचार्‍यांना दिली जाते. जनरल प्रॉव्हिडंट फंडाचा फायदा फक्त सरकारी कर्मचार्‍यांना मिळतो. सेवानिवृत्तीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध आहे. जीपीएफचा फायदा घेण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांना पगाराचा काही भाग जनरल प्रॉव्हिडंट फंडामध्ये ठेवावा लागेल. सामान्य भविष्य निर्वाह निधीत काही सरकारी कर्मचाऱ्यांना बचत करणे बंधनकारक आहे.

सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 15 टक्के हिस्सा सामान्य भविष्य निर्वाह निधीला देऊ शकतात. सामान्य भविष्य निर्वाह निधी खात्यातील सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ‘अ‍ॅडव्हान्स’. या वैशिष्ट्यानुसार कर्मचारी आवश्यक असल्यास त्यांच्या जीपीएफ खात्यातून निश्चित रक्कम काढू शकतो. तसेच त्यानंतर ती जमा देखील करू शकतात. त्यांना यावर कोणताही कर भरावा लागत नाही. जीपीएफवरील व्याज दर तिमाही आधारावर सुधारित केले जातात.

(General provident fund interest rates for July 2021 Remains Unchanged)

संबंधित बातम्या :

SBI खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर कसा करू शकता क्लेम, जाणून घ्या सोपा मार्ग

ही टेक कंपनी यंदाच्या अखेरीस 500 लोकांना देणार नोकर्‍या, नेमकी पात्रता काय?

Share Market Record: पहिल्यांदाच शेअर बाजाराने ओलांडला 53000 हजारांचा टप्पा, निफ्टीही विक्रमी स्तरावर बंद

Published On - 1:39 pm, Thu, 8 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI