AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today News | आज 4 ऑगस्ट 2022 रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 51,815 रुपये तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51608 रुपये आहे.

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, काय आहेत आजचे दर?
आज सोने चांदीत किंचित वाढImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 04, 2022 | 2:04 PM
Share

Gold Silver Price Today News | भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) गुरुवारी सोने-चांदीचे दर जाहीर झाले. ताज्या दरांवर नजर टाकली तर सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate Today) तेजी पाहायला मिळाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 51,815 रुपये तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51608 रुपये आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचे दर 57,598 रुपये झाले आहेत. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळच्या वेळी 995शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचा भाव 51,608 रुपया आहे, तर 916 शुद्धतेचे सोने आज 47463 रुपये विक्री होत आहे . याशिवाय 750 शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 38,861 रुपयांवर गेला आहे. त्याचबरोबर 585 शुद्धता असलेले सोने आज 30312 रुपये झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेची एक किलो चांदीचा आजचा भाव 57,598 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत ही आज वाढ झाली  आहे. आता देशात सोन्यासाठी बुलियन एक्स्चेज सुरु झाल्याने देशभरात सोन्याच्या किंमती सारख्या असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोन्या-चांदीच्या किंमतीत काय बदल झाला आहे?

दररोज सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होत असतात. आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 999 शुद्धता असलेले सोने 249 रुपयांनी महागले आहे, 995 शुद्धता असलेले सोने 248 रुपयांनी, 916 शुद्धतेचे सोने 228 रुपयांनी, सोने 750 शुद्धतेचे सोने 186 रुपयांनी आणि सोन585 शुद्धतेसह सोने 146 रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीची किंमती आज 289 रुपयांनी महाग झाली आहे.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,140 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,430 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,460 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,170 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,460 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,170 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,460 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब