AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | अमेरिकेच्या धोरणांचा सोन्यावर परिणाम, सोन्या-चांदीचे दर स्थिर, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today News | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 8 ऑगस्ट रोजी सोने आणि चांदीच्या भावावर अमेरिकन बाजाराचा प्रभाव राहिला. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूचे दर स्थिर राहिले.

Gold Silver Rate Today | अमेरिकेच्या धोरणांचा सोन्यावर परिणाम, सोन्या-चांदीचे दर स्थिर, जाणून घ्या आजचा भाव
आजचे सोने चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 08, 2022 | 12:53 PM
Share

Gold Silver Price Today News | अमेरिकन बाजाराचा आंतरराष्ट्रीय सोने-चांदीच्या (Gold Silver Price Today)किंमतींवर परिणाम झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 8 ऑगस्ट रोजी सोमवारी देशातील सराफा बाजारात ही सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर होत्या. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील नोकऱ्यांच्या(Jobs in America) ठोस अहवालामुळे डॉलर आणि गंगाजळीत वाढ झाली आहे. आता पुन्हा अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आक्रमक व्याजदर वाढीची शक्यता बळावल्यानंतर सोमवारी सोन्याचे भाव स्थिर राहिले. मागील सत्रात 1% घसरण झाल्यानंतर स्पॉट गोल्ड 1.774.09 डॉलर प्रति औंसवर आले. अमेरिकी सोने वायदे बाजार 1,790.60 डॉलरवर स्थिर होता. डॉलर निर्देशांक 106.77 वर होता, जो शुक्रवारच्या 106.93 च्या उच्चांकाच्या जवळ आहे. 28 जुलैनंतर पहिल्यांदा डॉलर सर्वात मजबूत स्थिती पोहचला आहे. अमेरिकन फेडने सप्टेंबर महिन्यात पुढील धोरणात्मक निर्णय 75 बेसिस पॉईंटने पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईविरोधात अमेरिकन मध्यवर्ती बँकेची (American Federal Bank)सुरु असलेली ही लढाई सोन्यातील गुंतवणूक बळकट करत आहे. महागाई वाढल्यानंतर सोन्यात गुंतवणूक फायदेशीर आणि सुरक्षित मानण्यात येते.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,550 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,870 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 574 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ