AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : दसऱ्याला जम के करा खरेदी, स्वस्त झाले सोने-चांदी

Gold Silver Rate Today : दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच सोने-चांदीने आनंदवार्ता आणली. दोन्ही मौल्यवान धातूमध्ये चांगलीच घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना दसऱ्याला खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. गेल्या पंधरवाड्यात या धातूंनी चमकदार कामगिरी बजावली. मोठी मजल मारली. ऐन सणासुदीत दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळाले...

Gold Silver Rate Today : दसऱ्याला जम के करा खरेदी, स्वस्त झाले सोने-चांदी
| Updated on: Oct 24, 2023 | 8:39 AM
Share

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : धनत्रयोदशीपर्यंत सोने-चांदीत स्वस्ताईची शक्यता आहे. सध्या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्याची चुणूक दिसून आली.त्यापूर्वी डॉलरने महागाईच्या आघाडीवर मोर्चा संभाळल्याने सोने-चांदीची फसगत झाली होती. किंमती सातत्याने घसरत होत्या. त्यामुळे दसऱ्याला स्वस्त भावात खरेदीचा अनेकांची योजना होती. त्यावर इस्त्राईल-हमास युद्धाने पाणी फेरले. या मौल्यवान धातूला यु्द्धामुळे चांगलेच बळ मिळाले. गेल्या आठवड्यात सोमवार-मंगळवारी किंमतीत घसरण झाली. पण आतापर्यंत महागाईची फोडणी बसली. सोमवारी सोने-चांदी (Gold Silver Price Today 24 October 2023) पुन्हा स्वस्त झाले.

गेल्या आठवड्यात 1800 रुपयांची झेप

गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्यात सुरुवातीचे दोन दिवस वगळता, बुधवारपासून किंमतींनी मोठी झेप घेतली. 18 ऑक्टोबरला 540 रुपयांनी, गुरुवारी 270 रुपयांनी, शुक्रवारी 780 रुपयांची उसळी घेतली. 21 ऑक्टोबरला 210 रुपयांची तेजी आली. गेल्या आठवड्यात 1800 रुपयांनी भावात वाढ झाली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या. आता 22 कॅरेट सोने 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

चांदीत घसरण

गेल्या आठवड्यात सुरुवातीला घसरणीचे सत्र होते. त्यानंतर बुधवारी 18 ऑक्टोबरला एक हजारांनी भाव वधारला. 19 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 21 ऑक्टोबर रोजी 1200 रुपयांनी दर वधारले. या आठवड्यात 23 ऑक्टोबर रोजी किंमतीत 200 रुपयांची घसरण आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,698 रुपये होते. 23 कॅरेट 60,455 रुपये, 22 कॅरेट सोने 55,600 रुपये, 18 कॅरेट 45,524 रुपये, 14 कॅरेट सोने 35,508 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72094 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....