Gold And Silver Price Today : आज सकाळी काय मौल्यवान धातुचा भाव? 24K, 22K, 18K, 14K सोन्याची किंमत काय?
Gold And Silver Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पण आज सकाळी घसरणीचे संकेत आहेत. किंमतींवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम दिसून येतो. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोने आणि चांदीचा काय आहे भाव?

Gold And Silver Price Today In India 16 September 2025 : काही दिवसांपासून सोने आणि चांदीता तोरा वाढलेला आहे. किंमती सातत्याने वाढत आहेत. तर काही दिवसी दरात घसरणही दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने (IBJA) आज सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत घसरून 109511 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली. तर चांदीतही घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 1,27,791 रुपये प्रति किलो इतका आहे. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोने आणि चांदीचा काय आहे भाव?
सोन्याची किंमत किती?
goodreturns.in नुसार, 15 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,121 रुपये होता. 9 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,195 रुपये होते. 10 रुपयांनी किंमती कमी झाल्या होत्या. तर आज 16 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 11,208 रुपये आहे. तर 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 10,275 रुपये इतकी आहे.
चांदी घसरली
गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची उसळी घेतली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 15 सप्टेंबर रोजी चांदीत कोणताही मोठा बदल दिसून आला नाही. तर सकाळच्या सत्रात गुडरिटर्न्सनुसार, चांदीत घसरण दिसून आली. एक किलो चांदीचा भाव 1,32,900 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे.. 24 कॅरेट सोने 1,09,510 रुपये, 23 कॅरेट 1,09,070, 22 कॅरेट सोने 1,00,310 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,130 रुपये, 14 कॅरेट सोने 64,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,27,791 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
शुद्ध सोन्याची ओळख अशी करा
सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.
