AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने आणि चांदीचे दर आकाशाला भिडले, विकायचे की खरेदी करायचे, एक्सपर्टचा सल्ला काय ?

गोल्ड-सिल्वरमध्ये प्रचंड दरवाढ सुरु आहे. जागतिक तणावाच्या स्थितीत गुंतवणूकदारासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता नफा कमवावा की नवीन सोने खरेदी करावी ? चला तर तज्ज्ञांकडून माहिती घेऊयात...

सोने आणि चांदीचे दर आकाशाला भिडले, विकायचे की खरेदी करायचे, एक्सपर्टचा सल्ला काय ?
Gold and silver price
| Updated on: Jan 15, 2026 | 5:17 PM
Share

सोने आणि चांदीच्या दागिन्याचे दर आकाशाला भिडले असून गुंतवणूकांची नजर लागली आहे. जानेवारी 2026 च्या पहिल्याच दोन आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातू नवे रेकॉर्ड केला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज  ( MCX ) वर सोने सुमारे 1.40 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास पोहचले आहे. तर चांदी 2.60 लाख रुपये प्रति किलोच्यावर पोहचली आहे.

सोने आणि चांदीत इतक्या प्रचंड दराने वाढ होत असल्याने सर्वसामान्याच्या मनात आता नफा कमवण्याची हीच संधी असल्याचे वाटत आहे.. ? काही जण आणखी दर वाढीची वाट पाहात आहेत. आता सोने आणि चांदीच्या दरात नव्याने गुंतवणूकीचा विचार करीत आहात तर आता सोने आणि चांदी खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ? असा सवाल केला जात आहे.

सोन्यात दरवाढ का होत आहे ?

एक्सपर्ट्सच्या मते सोने आणि चांदीच्या दरवाढी मागे जगातील वाढता तणाव आहे. अमेरिका, इराण, व्हेनेझुएला, चीन आणि जपानशी संबंधित घटनांनी ग्लोबल मार्केटमध्ये भीती आणि अनिश्चितता वाढली आहे. जेव्हा जगात अस्थिरता वाढत असते. तेव्हा गुंतवणूक शेअर आणि रिस्क्री एसेट्सचे पैसे काढून सुरक्षित जागी गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती वाढते. याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर भरमसाठ टॅरिफची धमकी दिल्याने बाजारात चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्वातंत्र्यासंदर्भात उठणाऱ्या प्रश्नांनी गुंतवणूकदारांना आणखी सर्तक केले आहे.

साल 2026 मध्ये तेजी कायम राहणार ?

मोठे ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार साल 2026 मध्ये सोन्याची स्थिती अस्थिर राहाणार आहे. त्यात अनेक बदल आणि चढ-उताराने भरले आहे. अशा वातावरणात सोने आणि चांदी महत्वाचे आहे. रिपोर्टनुसार सेंट्रल बँका सतत सोन्याची खरेदी करत आहेत. खाणीतून पुरवठा मर्यादित होत आहे. आणि जुन्या सोन्याची विक्री देखील जास्त वाढत नाहीए, या कारणाने सोन्या-चांदी पोर्टफोलिओ मजबूत सहारा बनू शकते.

आता गुंतवणूकदारांनी काय करावे ?

इकॉनॉमिक्स रिपोर्टमध्ये आनंद राठी शेअर्सच्या कमोडिटी एक्सपर्ट मनीष शर्मा यांच्या मते सध्या जागतिक तणाव कमी होण्याचे काहीही संकेत नाहीत. यामुळे नजिकच्या भविष्यात सोने आणि चांदीच्या किंमती चढ्याच राहू शकतात. मात्र, सध्याच्या गुंतवणूकदारांना ते सल्ला देत आहेत की संपूर्ण पैसा काढण्याऐवजी 40 ते 50 टक्क्यांपर्यंत नफा बुक करणे समजदारी होऊ शकते. यामुळे लाभ सुरक्षित राहिल आणि जर किंमती आणखी वाढल्या तर गुंतवणूक कायम राहिल. नव्या गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला आहे की एकसाथ मोठी रक्कम गुंतवणूक करु नये. गुंतवणूकदारांनी हळूहळू, छोट्या भागात SIP सारख्या पद्धतीने गुंतवणूक करावी, म्हणजे जोखीम कमी होऊ शकते.सोने आणि चांदी आता ही रेकॉर्डस्तरावर पोहचली आहे. परंतू सध्याची भाववाढ भीती आणि अस्थिरतेमुळे निर्माण झाली आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.