Gold-Silver Price: खरेदी सोडाच विकत घेण्याचा विचारही मुश्किल ! सोन्या-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, आज भाव किती ?
देशभरात आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. वायदा बाजारात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला असून चांदीच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. सर्वसामान्य लोकं तर हे धातू विकत घेण्याचा विचार करतानाही कचरतील...

Gold-Silver Price : शेअर बाजाराची चाल आज स्थिर असली तरी भारतीय कमॉडिटी मार्केट आज तेजीत आहे. जागतिक ट्रेड वॉर आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे सराफा बाजारात तेजी आली आहे. आज म्हणजेच 21 जानेवारी 2026 रोजी सोने आणि चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला. मल्टी कमोडिटी मार्केट म्हणजेच MCXवर सोन्याच्या (Gold rates) भावात मोठी वाढ झाली असून 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं चक्क दीड लाखांपार गेलं आहे. 10 ग्रॅम सोन्याची आजची किंमत थेट 1 लाख 54 हजार रुपये इतकी झाली आहे. तर चांदीच्या भावाकडे (Silver rates) पाहून आ वासलेलाच राहील. प्रतिकिलो चांदीसाठी तब्बल 3 लाख 25 हजार रुपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या भावात 1600 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली असून आता हे दोन्ही धातू सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याबेहर पोहोचले आहेत.
दरम्यान आज स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सोन्याचा भाव 3.10 % वाढला असून किंमती थेट 4550 रुपयांनी महागल्या आहेत. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आता1 लाख 55 हजार 780 रुपयांवर पोहोचला आहे. एवढंच नव्हे तर चांदीही तेजस्वीपणे चमकत आहे. आज स्पॉट मार्केटमध्ये चांदीचे दरही चांगलेच वाढले असून एक किलो चांदीची किंमत 3 लाख 24 हजार 910 रुपये इतकी झाली आहे.
दिल्ली-मुंबईचे भाव किती ?
देशाची राजधानी आणि आर्थिक राजाधानी अर्थात दिल्ली आणि मुंबईतही या दोन्ही धातूंचे भाव गगनाला भिडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत विक्रमी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 6 हजार 430 रुपयांनी किंवा अंदाजे 4.28 टक्क्यांनी वाढून लाख 57 हजार 130 वर पोहोचली आहे. दि ल्लीत चांदीच्या किमतीही प्रति किलोग्रॅम अंदाजे 2 टक्क्यांनी वाढून3 लाख 29 हजार 020 वर पोहोचल्या आहेत.
दरम्यान, मुंबईतल्या किमती दिल्लीसारख्याच आहेत. आर्थिक राजधानीतही सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत. मुंबईत 24 कॅरेटच्या 1 तोळा किंवा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 57 हजार 400 रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीचा भावही 6250 रुपयांनी वाढून एका किलोसाठी आता 3 लाख 29 हजार 580 रुपये मोजावे लागत आहेत.
अमेरिका-युरोप तणाव ठरलं मुख्य कारण
अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील परिस्थिती, जी मोठ्या व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरोपियन संसद लवकरच जुलैमध्ये झालेल्या अमेरिकेच्या व्यापार कराराला मंजुरी देण्याची प्रक्रिया थांबवू शकते. शिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या आपल्या इराद्यापासून मागे हटणार नसल्याचे वक्तव्य केल्याने घबराटीचे वातावरण आहे.
येत्या 1 फेब्रुवारीपासून आठ युरोपीय देशांवर 10% कर लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे आणि 1 जून 2026 पासून हा कर 25 % पर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तर देताना युरोपीय देश ‘अँटी-कोर्शन इंस्ट्रूमेंट’ हे सक्रिय करण्याचा विचार करत आहेत,. परदेशी सरकारांकडून येणाऱ्या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली हीव्यापार बचाव यंत्रणा आहे.
