AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold And Silver Rate Today: 15 मिनिटांत सोनं 900 रुपयांनी स्वस्त, चांदी 1200 रुपयांनी घसरली

Gold And Silver Rate Today: भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांतच सोन्याच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली. जाणकारांच्या मते, डॉलर निर्देशांकाच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold And Silver Rate Today: 15 मिनिटांत सोनं 900 रुपयांनी स्वस्त, चांदी 1200 रुपयांनी घसरली
gold rate
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:23 PM
Share

Gold And Silver Rate Today: 15 मिनिटांतच सोन्याच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली. डॉलर निर्देशांकाच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरला बळ मिळत आहे. ट्रम्प यांनी काही देशांवरील शुल्क वाढवण्याची भाषा केली आहे.

न्यूयॉर्कपासून ते भारताच्या बाजारपेठांपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांतच सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरातही घसरण झाली.

जाणकारांच्या मते, डॉलर निर्देशांकाच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरला बळ मिळत आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी काही देशांवरील शुल्क वाढवण्याची भाषा केली आहे. सोने-चांदीचे भाव किती झाले आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो.

एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत सोने 900 रुपयांपर्यंत घसरले. आकडेवारीनुसार, ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याचा भाव 76,201 रुपये प्रति 10 ग्रॅमवर दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा भाव 77,128 रुपये होता.

चांदी 1200 रुपयांनी स्वस्त

दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण होताना दिसत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 मिनिटांत चांदीचा भाव 1175 रुपयांनी घसरून 90,034 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. आकडेवारीवर नजर टाकली तर शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा भाव 91,209 रुपये होता. तर आज 90,555 रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा भाव 974 रुपयांनी घसरून 90,235 रुपयांवर पोहोचला आहे.

विदेशी बाजारांची स्थिती

परकीय बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, कॉमेक्सवरील सोन्याचा वायदा भाव 33 डॉलर प्रति औंस च्या घसरणीसह 2,648.50 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. सोन्याचा स्पॉट भाव 16 डॉलरने घसरून 2,627.07 डॉलर प्रति औंस झाला आहे.

युरोपियन बाजारात सोन्याचा भाव 3 युरोने किरकोळ वाढला असून किंमत 2,496.26 युरो प्रति औंस आहे. दुसरीकडे, कॉमेक्सवरील चांदीचा वायदा 1.42 टक्क्यांनी घसरून 30.67 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीचा स्पॉट भाव 1.28 टक्क्यांनी घसरून 30.23 डॉलर प्रति औंस झाला आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी