AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today gold, silver prices : आज पुन्हा सोने स्वस्त; चांदीच्या दरातही घसरण, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले आहे, गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सोन्यातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

Today gold, silver prices : आज पुन्हा सोने स्वस्त; चांदीच्या दरातही घसरण, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
सोने-चांदीच्या दरात घसरण Image Credit source: twitter
| Updated on: May 06, 2022 | 2:39 PM
Share

सोन्याच्या (gold) दरात घसरण सुरूच आहे. आज पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात (Today gold, silver prices) सातत्याने घसरण होत असल्याचे पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरट सोन्याचे दर 51243 रुपये प्रति तोळा असून, 22 कॅरट सोन्याचा दर 47127 रुपये एवढा आहे. तर चांदी दर प्रति तोळा 62358 रुपये एवढा आहे. सोन्या-चांदीचे (silver) दर हे दिवसातून दोनदा जाहीर करण्यात येतात. एक सकाळी सराफा बाजार सुरू झाल्यानंतर तर दुसऱ्यांदा सायंकाळी पाच वाजता. तसेच सोन्याचे दर हे सोने अधिक दागिने घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्यामुळे सोन्याचे दर वेगवेगळ्या शहरात बदललेले दिसतात. सोन्याच्या दरात तफावर आढळून येते. भारतात एकीकडे सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे मागणी वाढत असताना देखील सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. तीन आठवड्यापूर्वी सोन्याचे दर 54 हजार प्रति तोळ्यावर पोहोचले होते. मात्र आता त्यात घसरण झाली असून, ते प्रति तोळा 51243 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चितेंचे वातावरण आहे. स्वस्त सोन्याचा गुंतवणुकीला फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

  1. आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 400 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 700 रुपये एवढा आहे.
  2. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 480 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 780 रुपये आहे.
  3. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 480 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 780 आहे.
  4. औरंगाबादमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 420 व 51 हजार 750 इतका आहे.
  5. आज चंदीचा दर प्रति तोळा 62358 रुपये एवढा आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा