AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Update : सोन्याची महागाईकडे आगेकूच! भाव वधारले, इतकी बसेल झळ

Gold Silver Price Update : सोन्याने बुधवारी सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा भाव वाढीची वर्दी दिली. मंगळवारी सकाळी भावात घसरण झाली होती. ही घसरण सोने आणि चांदीने भरून काढली. आजचा भाव किती आहे.

Gold Silver Price Update : सोन्याची महागाईकडे आगेकूच! भाव वधारले, इतकी बसेल झळ
भाव वाढीची वर्दी
| Updated on: Apr 05, 2023 | 9:14 AM
Share

नवी दिल्ली : देशात सोने-चांदीने (Gold Silver Price Update) पुन्हा एकदा महागाईची वाट धरली आहे. 5 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ झाली. सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढउतार सुरु आहे. प्रत्येक शहरानुसार, घडवणीचा खर्च, कर यांच्यासह भावात बदल होतो. 22 कॅरेट सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 55,450 रुपये प्रति तोळा झाला. तोळ्यामागे 600 रुपयांनी भाव वधारले. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 60,480 रुपये आहे. 660 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली. सोन्याच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे. चांदी आज संध्याकाळपर्यंत भाव वाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा करण्याच्या तयारीत आहे.

दोन महिन्यात विक्रम मोडीत

सोन्याने सर्वात अगोदर 2 फेब्रुवारी रोजी विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने 19 मार्च रोजी 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सोने याच भावांच्या दरम्यान खेळत आहे. तर चांदी 74,000 रुपयांच्या आतबाहेर आहे. आज पुन्हा किंमतीत वाढ झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत.

चांदी विक्रम मोडणार

चांदीच्या भावाने उसळी घेतली आहे. चांदीचा आलेख उंचावत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात वाढ होत आहे. चांदी लवकरच यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याच्या बेतात आहे. आज हा भाव 74600 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. 4 एप्रिल रोजी एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये होता. चांदी संध्याकाळपर्यंत हा विक्रम मोडण्याच शक्यता आहे.

चार शहरातील भाव

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,300 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 60,330 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,300 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,330 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,300 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,330 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,330 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,360 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

भाव एका मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच