Gold Silver Price Update : खुशखबर! सोने-चांदीचा भाव घसरला, स्वस्तात खरेदीची संधी

Gold Silver Price Update : ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. सोने-चांदीमध्ये आज घसरण झाली. सकाळच्या सत्रात किंमतीत तोळा आणि किलोमागे भाव घसरले. खरेदीदारांना मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी मिळाली.

Gold Silver Price Update : खुशखबर! सोने-चांदीचा भाव घसरला, स्वस्तात खरेदीची संधी
आनंदवार्ता
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:33 AM

नवी दिल्ली : देशात सोने-चांदीने (Gold Silver Price Update) गुंतवणूकदारांना आनंदवार्ता दिली आहे. 4 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात मौल्यवान धातुंमध्ये घसरण झाली. एक तोळा आणि किलोमागे भाव घसरले. खरेदीदारांना मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी मिळाली. सोन्याने सर्वात अगोदर 2 फेब्रुवारी रोजी विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने 19 मार्च रोजी 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोने याच भावांच्या दरम्यान खेळत आहे. तर चांदी 74,000 रुपयांच्या आतबाहेर आहे. पण आज दोन्ही धातुंनी घसरणीची वर्दी दिली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत.

22 कॅरेट सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 54,850 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोमवारी हे भाव 55,150 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 59,820 रुपये आहे. सोमवारी हा भाव 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे.

चांदी विक्रमाजवळ

हे सुद्धा वाचा

चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. चांदीचा आलेख उंचावत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे. चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आज हा भाव 74000 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. काल एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे. चांदी लवकरच हा रेकॉर्ड मोडणार आहे.

गुडरिटर्न्सचा दावा काय

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,700 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 59,670 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,730 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर59,700 रुपये आहे.

गुंतवणूकदार मालामाल

सोन्याने भावात एक विक्रम केला होता. पण कमाई झाली ती चांदीमुळे. मार्च महिन्यातील 30 दिवसांत गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त 12 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने जवळपास 7 टक्के परतावा दिला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि चीनमधील परिस्थिती सुधारत असल्याने चांदीची (Silver Return) मागणी वाढली आहे. यामुळे चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारही अचंबित झाले आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.