AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? सोनं 19 हजारांनी होणार स्वस्त? ‘या’ एका कारणामुळे भाव गडगडणार?

सोने भविष्यात तब्बल 19 हजारांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 19 हजारांनी सोनं स्वस्त का होऊ शकतं? असं विचारलं जात आहे.

काय सांगता? सोनं 19 हजारांनी होणार स्वस्त? 'या' एका कारणामुळे भाव गडगडणार?
gold rate today
| Updated on: May 03, 2025 | 5:15 PM
Share

Gold Rate : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. सोन्याने एक लाखाचा टप्पाही पार केल्याचं आपण पाहिलं. आता मात्र सोन्याच्या दरात घसरण होत असलेली पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता सोने भविष्यात तब्बल 19 हजारांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 19 हजारांनी सोनं स्वस्त का होऊ शकतं? त्यामागे नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊ या…

सोनं होऊ शकतं स्वस्त

सोन्याने काही दिवसांपूर्वी प्रति तोळा 1 लाख रुपयांचा आकडा पार केला होता. आता मात्र सोने साधारण 7 ते 8 हजारांनी कमी झालेले आहे. असे असतानाच आगामी चार ते सहा महिन्यांत सोन्याचा भाव ऑल टाईम हायवरून थेट 19 हजारांनी कमी होऊ शकतो.

सोनं किती रुपयांनी स्वस्त होणार?

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी आगामी चार ते सहा महिन्यांत सोनं 80 हजारांपर्यंत कमी होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली आहे. सोन्याचा भाव भविष्यात 80 ते 85 हजार प्रति दहा ग्रॅम होण्याची शक्यता आहे, असं भाकित त्यांनी केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयात करारात वाढ केल्यामुळे सोन्याच्या भावात ही वाढ झाली होती. ट्रम्प यांनी आयात कराराबाबत थोडी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता जागतिक बाजारात स्थिरता पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या भावातही घसरण झाली होती. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता आगामी काळात सोन्याचा भाव 80 हजारांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

सोन्याचा भाव कमी होण्याची कारणं काय?

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना साधारण 21 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत. एका वर्षात सोन्याने साधारण 32 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या मागे अनेक कारण आहे. जागतिक पातळीवरील तणाव, भूराजकीय परिस्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सध्या मात्र जागतिक पातळीवरील तणाव निवळला आहे. अमेरिका रशिया आणि युक्रेन यांच्यात कायमस्वरुपी शस्त्रसंधी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सोन्याच्या भाववाढीसाठी जी अनुकूल स्थिती झाली होती, ती सध्या राहिली नाही. त्यामुळेच सोन्याच्या दरात घट होताना दिसत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...