Gold Price: सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची घट, तोळ्याचा भाव ...

सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने 7 ऑगस्टच्या प्रतितोळा 56 हजार 200 रुपयांवरुन सोन्याचे दर 52 हजारांवर आले (Gold price rate decreases).

Gold Price: सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची घट, तोळ्याचा भाव ...

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या 7 ऑगस्टच्या प्रतितोळा 56 हजार 200 रुपयांच्या दरावरुन सोन्याचा दर 52 हजारांवर आला आहे (Gold price rate decreases). म्हणजेच सोन्याच्या दरात 4 हजारपेक्षा अधिकची घट झाली आहे. या आठवड्यात सोने-चांदीचे दर जवळपास स्थिर होते. आठवड्याच्या सरुवातीलाच 17 ऑगस्टला सोन्याचे दर 52 हजार 151 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 67 हजार 106 रुपये प्रति किलो इतके होते. मात्र, शुक्रवारी (21 ऑगस्ट) या दरात 0.29 टक्क्यांची घसरण होऊन प्रतितोळे दर 52,001 वर स्थिर झाले.

चांदीच्या दरातही 0.95 टक्क्यांची घसरण होऊन हा तर प्रतिकिलो 66,954 रुपयांवर स्थिर झला. जागतिक पातळीवरील किमतीचा विचार करता सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर सोन्याचे दर 0.50 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस (28.35 ग्रॅम) 1 हजार 947 डॉलर झाले आहेत. याचप्रमाणे चांदीच्या जागतिक बाजारातील भावातही घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 1.55 टक्के घट झाली. चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 26.88 डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) इतके झाले.

जागतिक बाजारात डॉलरचं मजबूत पुनरागमन झालं आणि अमेरिकेतील व्यापारातही सुधारणा झाली. त्यामुळे सोन्याच्या मागणी काहीशी घट पाहायला मिळाली. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर सोन्याच्या दरातील वाढ कायम आहे, असं मत विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. ग्राहक येत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनाही तोटा सहन करावा लागत होता. पण आता सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे नागरिकांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. 3 ऑगस्टला सोन्याचा भाव 53 हजार 717 रुपये प्रतितोळा होता. 4 ऑगस्टला सोन्याचा भाव वाढून 54 हजार 551 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 5 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 098 रुपये प्रतितोळा होता. 6 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 845 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 7 ऑगस्टला सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 56 हजार 191 रुपये प्रतितोळा भाव गाठला होता.

संबंधित बातम्या : 

Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…

Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर…

संबंधित व्हिडीओ :


Gold price rate decreases

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *