Gold Price Today: सोने महागले, तर चांदी झाली स्वस्त, पटापट तपासा नवे दर

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 46100 रुपये झाला. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45350 रुपयांवर स्थिर आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 49480 रुपये आहे.

Gold Price Today: सोने महागले, तर चांदी झाली स्वस्त, पटापट तपासा नवे दर
Gold / Silver Price Today

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. डॉलर कमकुवत होत असल्यानं सोने-चांदीचे भावही वाढत आहेत. बुधवारी आज सोन्याचा भाव वधारला असला तरी चांदीमध्ये घसरण सुरूच आहे. सोने 170 रुपयांनी महाग झाले असून, चांदीमध्ये 400 रुपयांची घसरण झालीय.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये इतका

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 46100 रुपये झाला. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45350 रुपयांवर स्थिर आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 49480 रुपये आहे. आज चेन्नईत 22 कॅरेटसाठी 43500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 47460 रुपये आहे. कोलकात्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 45550 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव 48250 रुपयांवर स्थिर आहे.

सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46065 रुपये

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46065 रुपये आहे. त्यात 109 रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव 46126 रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव 60059 रुपये आहे. त्यात 405 रुपयांची घसरण झाली. त्याआधी चांदीने 59905 रुपयांची नीचांकी पातळी गाठली.

सोन्याचे दर सतत का कमी होतायत? (Gold price down)

अमेरिकन सेंट्रल बँकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर सोने आणि चांदी कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केला नाही आणि बॉण्ड खरेदी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
तज्ज्ञ म्हणतात की, जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचे मूल्य कमी होते. त्या वेळी लोक पैसे सोन्याच्या स्वरूपात ठेवतात. अशा प्रकारे जेव्हा महागाई बराच काळ उच्च राहते, तेव्हा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. RBI च्या मते, जर देशात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली, तर हालचालींवर निर्बंध दीर्घकाळ लागू राहतील. याचा पुरवठा साखळीवर परिणाम होईल. असे झाल्यास महागाई वाढू शकते. अशा परिस्थितीत ते सोन्याच्या किमतीत वाढ दर्शवतात.

संबंधित बातम्या

जगातील 5 सर्वात मोठ्या करोडपतींची यादी बदलली! अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस आता नंबर 1 नाहीत

पेटीएमने ग्राहकांना दिली मोठी सुविधा, आता तुम्ही डिजिटल वॉलेटमध्ये थेट परदेशातून मागवू शकाल पैसे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI