नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) आज पुन्हा बदल पहायला मिळाला. सोन्याचे भाव घसरले तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांच्या (Investors) आणि खरेदीदारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तर चांदीच्या खरेदीदारांना जास्त पैसे मोजावे लागले. भावात फार मोठा फरक पडला नसला तरी त्याचा फायदा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढले आहे तर चांदीच्या किंमती काही दिवसात 75 हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.